Thane Women visits pakistan to meet instagram boyfriend with fraud documents Esakal
मुंबई

Instagram Love: दोन चिमुकल्या मुली अन् खोटी कागदपत्रे! ठाण्याच्या तरुणीनं इन्स्टा बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी थेट गाठलं पाकिस्तान

आशुतोष मसगौंडे

पाकिस्तानमध्ये असलेल्या प्रियकराला भेटण्यासाठी ठाण्यातील एका 23 वर्षांच्या तरुणीने पासपोर्ट आणि व्हिसासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नगमा नूर मकसूद अली उर्फ ​​सनम खान या आरोपीने खोटी कागदपत्रे वापरून 'बनावट' पासपोर्ट आणि व्हिसा मिळवला आणि खोटी ओळख घेऊन पाकिस्तानचा प्रवास केला.

यामध्ये धक्कादायक बाब अशी की, आपल्या पतीला कंटाळलेल्या या तरुणीने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झालेल्या पाकिस्तानातील प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानला जाताना आपली दोन मुलींनाही नेले होते. यासाठीही तिने खोटी कागदपत्रे वापरली होती. याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

आई मुंबईतील बारमध्ये डान्सर

नगमा ही मूळची उत्तर प्रदेशची असून, तिने कौटुंबिक हिंसाचारामुळे पती मकसूद अलीला सोडले आणि मुलुंडमधील एका डान्सबारमध्ये बार डान्सर म्हणून काम करणाऱ्या आईसोबत राहण्यासाठी ठाण्यात आल्याचे तपासात उघड झाले.

तिच्या पतीने तिचा आणि तिच्या मुलींचा मागोवा लागू नये किंवा तिची ओळख पटू नये, म्हणून तिने फरार एजंटच्या मदतीने सनम खान म्हणून नवीन ओळख मिळवली. या एजंटने तिच्या मुलींसाठी खोटी जन्म प्रमाणपत्रे देखील मिळवून दिली होती.

महिलेशिवाय, पोलिसांनी ट्रॅव्हल एजंटविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. त्याने पासपोर्टसाठी 20,000 रुपयांची बनावट कागदपत्रे तयार केली. सध्या तो फरार आहे.

इन्स्टाग्रामवर जुळले प्रेम

या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "आरोपी तरुणी मूळची उत्तर प्रदेशची असून पतीच्या छळाला कंटाळून तिच्या आईकडे ठाण्यात आली. पुढे तिने इंस्टाग्रामवर पाकिस्तानमधील एका व्यक्तीची मैत्री केली आणि शेवटी ती त्याच्या प्रेमात पडली. काही दिवसांनंतर, दोघांनी लग्न करण्याचा आणि पाकिस्तानातील अबोटाबादमध्ये एकत्र राहण्याचा निर्णय घेतला, जिथे प्रियकर कामाला होता."

का काढली खोटी कागदपत्रे?

या तरुणीला भीती होती की, नवरा तिचा शोध घेण्यासाठी मागे येईल आणि यामुळे तिच्या प्रेमसंबंधात अडचणी निर्माण होती. यामुळे तिने नावासह संपूर्ण ओळख बदलण्याचा निर्णय घेतला.

यासाठी तरुणीने तिचे नाव बदलले, बनावट आधार आणि पॅन कार्ड मिळवले आणि ठाण्यातील एका दुकानातून तिच्या मुलींचे नवीन जन्म प्रमाणपत्र बनवले. तिने या बनावट कागदपत्रांचा वापर पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी केला आणि यानंतर पोलीस पडताळणी देखील केली. पुढे तिने याच कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट आणि व्हिसा मिळवला आणि पाकिस्तानचा प्रवास केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT