मुंबई : लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलट यांना रेल्वे गाड्यांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी पहिल्यांदाच मध्य रेल्वेने आरएस व्हॉल्व्हच्या सिम्युलेटर कक्षामध्ये प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील लॉबीमध्ये आरएस व्हॉल्व्हचे सिम्युलेटर सिम्युलेटर केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.
भारतीय रेल्वेने विविध प्रकारचा रेल्वे गाड्या धावतात. प्रत्येक रेल्वे गाड्यांचे ब्रेकिंग सिस्टम वेगवेगळे असतात. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या रोलिंग स्टॉक्समध्ये ब्रेकिंगचे अंतर वेगळे असल्याने भूप्रदेश, ग्रेडियंट इत्यादी पॅरामीटर्समुळे गुंतागुंत अधिक आहे. त्यामुळे लोको पायलट-मोटरमॅनला योग्य प्रशिक्षण देण्यासाठी मुंबई विभागाने इन-हाऊस सिम्युलेटर मॉडेल विकसित करण्यात पुढाकार घेतला आहे.
यासाठी लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलट या दोघांनाही आपत्कालीन ब्रेकिंगची तरतूद करण्यात आली आहे. आपत्कालीन ब्रेक वापरण्यासाठी योग्य प्रशिक्षण अत्यंत आवश्यक आहे. ज्यामुळे त्यांना ट्रेन ऑपरेशन्स दरम्यान येणाऱ्या आव्हानांशी सामना करणे सोपे जात असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले.
एक मौल्यवान संसाधन
आरएस व्हॉल्व्ह सिम्युलेटर लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलटना योद्ध प्रशिक्षित देते. ज्यामुळे त्यांना ट्रेन ऑपरेशन्स दरम्यान येणाऱ्या आव्हानांशी प्रत्यक्ष परिचित होण्यास सक्षम करते. आरएस व्हॉल्व्ह सिम्युलेटर प्रशिक्षण यंत्र ट्रेनचा वेग समजून घेण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी एक मौल्यवान संसाधन म्हणून उपयुक्त आहे. विशेषत: वेगवेगळ्या सिग्नल सुद्धा आरएस व्हॉल्व्ह सिम्युलेटरमध्ये आहेत.
काय आहे नेमकी यंत्रणा?
आरएस व्हॉल्व्ह ही रेल्वेमध्ये वापरली जाणारी आपत्कालीन ब्रेकिंग प्रणाली आहे. जी रेल्वेच्या ऑपरेशन दरम्यान उद्भवणाऱ्या असामान्य परिस्थितींमध्ये सहाय्यक लोको पायलटद्वारे ऑपरेट केली जाते. यामुळे प्रवासी आणि माल यांच्या सुरक्षिततेसाठी ही यंत्रणा महत्त्वपूर्ण आहे.
ही सुविधा सर्व प्रकारच्या रोलिंग स्टॉकसाठी प्रवेशयोग्य आहे, मग ते रिकामे असो किंवा लोड केलेले, क्रू संवेदनक्षमतेत लक्षणीयरीत्या मदत करते आणि ट्रेन ऑपरेशन दरम्यान लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलट यांच्यातील आत्मविश्वास वाढवते.
रेल्वे कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल
सिम्युलेटर मॉड्यूल विविध अत्यावश्यक परिस्थितीत आणीबाणीच्या ब्रेकिंगसाठी प्रशिक्षणाची सुविधा तर देतेच पण ब्रेकिंगच्या परिणामकारकतेचे विश्लेषण आणि आणीबाणीच्या ब्रेकिंग अंतरांशी त्याचा परस्परसंबंध देखील देते. ही सुविधा सर्व प्रकारच्या रोलिंग स्टॉकसाठी प्रवेशयोग्य आहे, मग ते रिकामे असो किंवा लोड केलेले, क्रू संवेदनक्षमतेत लक्षणीयरीत्या मदत करते आणि ट्रेन ऑपरेशन दरम्यान त्यांचा आत्मविश्वास वाढवते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.