Cleaning 
मुंबई

Mumbai : मुंबईतील नालेसफाई कामाची भाजपाकडूनच पोलखोल; केवळ 30 टक्केच सफाई

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- मुंबईतील नालेसफाई आतापर्यंत केवळ 30 टक्के इतकीच झाही असून 80 टक्के नालेसफाई झाल्याचा पालिका प्रशासनाचा दावा खोटा असल्याचे स्पष्ट करीत मुंबईतील नालेसफाईच्या कामाचे भाजपाने पोलखोल केले.

पश्चिम उपनगरातील नाल्यांची आज मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ऍड आशिष शेलार यांनी पाहणी केली. त्यांनी साऊथ एव्हेन्यू नगर - गझदर बांध नाला, पवन हंस नाला व एस.एन.डी.टी. नाला, गजधर बांध पंपिंग स्टेशन, मिलिनेयम क्लब जवळ इर्ला नाला, मोगरा नाला, मेघवाडी नाला आदी नाल्यांची त्यांनी पाहणी केली.

या पाहणी दरम्यान पालिका प्रशासन करीत असलेले नालेसफाईचा 80 टक्के दावा खोटा असलल्याची टीका केली. पावसाळा जवळ आला असताना पालिका प्रशासनकडून नालेसफाई झाल्याचे सांगत जे आकडे सांगत आहेत ते केवळ रतन खत्रीचे आकडे आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

या दौऱ्यात आमदार अमित साटम भारती लवेकर माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट, विनोद मिश्रा, उज्वला मोडक, अभिजित सामंत, हेतल गाला, अलका केरकर, स्वप्ना म्हात्रे, योगिराज दाभाडकर, आदींसह पालिकेचे अधिकारी पस्थितीत होते.

नाले गाळाने भरलेले

राहुल नगर नाल्यात सफाईचे कामच झालेले नाही. गझदरबंध नाल्याचे काम आज सुरु केले आहे. आजच जेसीबी लावत तिथे गाळाचा अंदाज घेतला गेला. तर गझदरबंध पंपिंग स्टेशन समोर गाळाचे ढीग लागले आहेत. एसएनडीटी नाल्याचे काम ही नुकतेच सुरु झाले असून बेस्ट काँलनी नाल्यात वनस्पती उगवलेल्या दिसतायत.

प्रत्यक्षात केवळ २५ ते ३० टक्के काम झाले असताना महानगर पालिका करत असलेले ७० ते ८० टक्के सफाईचे दावे खोटे असल्याचे दिसून आल्याचे शेलार यांनी सांगितले.

कंत्राटदार ठाकरेंचेच

पालिकेचे सर्व दावे कंत्राटदारांच्या जीवावर होत आहेत. कामात निष्काळजीपणा सुरु आहे. नालेसफाईच्या २८० कोटीं पेक्षा जास्तच्या कामासाठी जे कंत्राटदार नियुक्त केले आहेत ते उद्धव ठाकरेंच्याच जवळचे, त्यांच्याच सत्ता काळातील आहेत. त्यांच्यावर आमचा, मुंबईकरांचा भरोसा नाही. कंत्राटदारांनी गैरव्यवहार केला आहे.

गाळाच्या मोजमापात हातचलाखी करीत आहेत. ही बाब आजच्या पाहणीत दिसून आल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले. आदित्य ठाकरे हे कंत्राटदारांची वकीली करीत असल्याची टिका त्यांनी केली आहे. मुंबईत पाणी भरणार नाही याची खात्री देणार काय असा सवाल त्यांनी ठाकरे यांना केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT