ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024 मुळे वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मधील आणि आजूबाजूच्या परिसरात मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता मुंबई वाहतूक पोलिसांनी व्यक्त केली आहे. यासह त्यांनी प्रवाशांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे.
हा हाय-प्रोफाइल कार्यक्रम Jio वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित केला जात आहे. त्यामुळे 30 ऑगस्ट पर्यंत या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होण्याची अपेक्षा आहे, परिणामी परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते.
मुंबई वाहतूक पोलिसांनी सांगितले की 30 ऑगस्टपर्यंत दररोज सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत, BKC मध्ये गर्दी वाढण्याची शक्यता आहे, परिणामी या भागातून जाणाऱ्यांना वाहणांना पुढे जाण्यास वेळ लागेल. प्रवाशांनी विलंब टाळण्यासाठी या तासांमध्ये BKC मार्गावरून प्रवास करू नये. (Mumbai Traffic News)
"28 ते 30 ऑगस्ट या कालावधीत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, BKC येथे आयोजित करण्यात येत असलेल्या कार्यक्रमामुळे, BKC मध्ये सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा अपेक्षित आहे," असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.
तसेच प्रवाशांनी BKC मार्ग टाळून जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR), सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड (SCLR) आणि ईस्टर्न फ्रीवे यांसारखे पर्यायी मार्ग वापरावेत असे आवाहन केले आहे.
ग्लोबल फिनटेक फेस्ट ही पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडिया (PCI), नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI), आणि Fintech Convergence Council (FCC) द्वारे दरवर्षी आयोजित केली जाणारी सर्वात मोठी फिनटेक परिषद आहे. पाचवा ग्लोबल फिनटेक फेस्ट 28-30 ऑगस्ट, 2024 रोजी बीकेसीत होणार आहे.
ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024 इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA) द्वारे सादर केला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.