Mumbai Trans Harber Link Sakal
मुंबई

Mumbai Trans Harber Link : कधी पूर्ण होणार? फायदा कोणाला? जगातल्या 10 नंबरच्या सागरी पुलावर शिंदे-फडणवीस, Video Viral

पारबंदर प्रकल्पाचे ९४ टक्के काम पूर्ण; नोव्हेंबर अखेरीस काम पूर्ण होणार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प गतीने पूर्णत्वाला जातो आहे. बुधवारी (ता.२४) रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पाचा आढावा घेतला. यावेळी मुंबई ते समुद्री मार्ग ते मुख्यभूमीशी प्रत्यक्ष जोडणी ( पॅकेज १ ते पॅकेज २) कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. या वर्षाअखेरी पर्यंत हा प्रकल्प लोकांसाठी खुला होईल अशी महिती यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या सुमारे २२ किमी लांबी मधील पॅकेज १, २ व ३ अंतर्गत काँक्रीटच्या गाळ्यांची उभारणी पूर्ण होत आहे. अशाप्रकारे पुलाचे मुंबई ते मुख्यभूमी पर्यंतचे जमिनीवरील तसेच समुद्रातील बांधकाम पूर्ण होणार आहे व मुंबई ते मुख्य भूमीच्या थेट जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. मुंबई पारबंदर प्रकल्पातील सर्व गाळयांच्या उभारणीचे वैशिष्टयपूर्ण व आव्हानात्मक बांधकाम पूर्ण होत आहे.

यातील प्रत्यक्ष जोडणीचा कार्यक्रम बुधवार दि.२४ मे २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी जपानचे मुंबईतील कौन्सिल्युट जनरल खासदार राहुल शेवाळे, एमएमआरडीए महानगर आयुक्त एस व्ही आर श्रीनिवास, जायकाचे प्रतिनिधी आणि एमएमआरडीएचे अभियंते उपस्थित होते.

मुंबई पारबंदर प्रकल्पांतर्गत या महत्वाकांक्षी समुद्री पुलाची मुख्य भूमीशी (mainland) प्रत्यक्ष जोडणी झाली. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या खास कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्रित या मार्गावरून प्रवास केला.

प्रकल्पामध्ये मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणान्या सुमारे २२ किमी लांबीच्या ६ पदरी (३ + ३ मार्गिका २ आपात्कालीन मार्गिका) पुल आहे. या पुलाची समुद्रातील लांबी सुमारे १६.५ किमी असून जमिनीवरील पुलाची एकूण लांबी सुमारे ५.५ किमी इतकी आहे. या पुलाला मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील शिवाजी नगर व राष्ट्रीय महामार्ग-४ब वर चिर्ले गावाजवळ आंतरबदल आहेत. प्रकल्प नोव्हेंबर, २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

प्रकल्पाचे फायदे :

• नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील प्रदेशाचा भौतिक व आर्थिक विकास

• प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाशी वेगवान दळणवळण शक्य

• मुंबई पोर्ट व जवाहरलाल नेहरू पोर्ट यांचे दरम्यान वेगवान दळणवळण शक्य

मुंबई व नवी मुंबई, रायगड, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व मुंबई-गोवा महामार्ग यामधील अंतर सुमारे १५ किमी कमी झाल्यामुळे इंधन, वाहतूक खर्च आणि मौल्यवान वेळेत सुमारे एका तासाची बचत

प्रकल्पाची वैशिष्ठ्ये :

-हा भारतातील सर्वात जास्त लांबीचा आणि जगभरातील १० व्या लांबीचा पाण्यावरील समुद्रावरील पूल ठरणार आहे.

-ऑर्थोट्रोपिक स्टील डेक पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा भारतात प्रथम वापर

- ८५००० मे.टन ऑथोट्रॉपीक स्टीलचा वापर

- १,७०,००० मे. टन वजनाच्या स्टोलच्या सळयांचा प्रकल्पात वापर

- ४८,००० किमी लांबीच्या प्रिस्ट्रेसोंग वायर्सचा प्रकल्पात वापर

- ९,७५,००० घनमीटर कॉक्रीटचा प्रकल्पात वापर

- ३५ किमी लांबीच्या पाईल लाईनर्सचा प्रकल्पात वापर

सद्यःस्थितीत प्रकल्पाच्या स्थापत्य कामांची सर्वसाधारण भौतिक प्रगती इतकी ९४% असून प्रकल्पाची सर्वसाधारण प्रगती आहे. प्रकल्पाची आर्थिक प्रगती ९३ % इतकी आहे. प्राधिकरणामार्फत प्रकल्प राबविताना प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्यात आले असून प्रकल्पबाधित मच्छिमारांना शासनाच्या धोरणानुसार नुकसानभरपाई देण्यात आली आहे व देण्यात येतही आहे, अशी माहिती एमएमआरडीए चे महानगर आयुक्त एस व्ही आर श्रीनिवास यांनी दिली.

ज्या राज्याचे इन्फ्रा प्रकल्प गतिमान असतात त्या राज्याची सर्वाधिल प्रगती होते. मुंबई, नवी मुंबई आणि आता तिसरी मुंबई उभी राहतेय. नवी मुंबई, मुंबई आणि रायगडला जोडणारा हा प्रकल्प आहे. चिर्लेमध्ये हा पूल सुरू झाल्यानंतर एक मोठा इकॉनॉमिक कोरिडॉअर उभा राहील. हा पूल राज्याची आर्थिक भरभराट करणारा ठरेल

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रकल्प आता निर्णयाक टप्प्यावर आहे. नोव्हेंबरमध्ये प्रकल्प पूर्ण होईल. हा पूल नाही तर इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे. यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळेल. ट्रेलियन डॉलर अर्थव्यस्थेकडे जाणारा मार्ग आता ट्रान्स हार्बरने जाणार. ३०-३५ वर्षे केवळ चर्चा असणारा हा पूल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात प्रत्यक्ष उभारू शकलो. पर्यावरणीय आणि जैवविविधता याला हानी पोहोचू न देता आपण हे काम पूर्ण केले. लवकरच इस्टर्न फ्री वे ने थेट नरिमनला जोडणाऱ्या बोगद्याचे काम आपण सुरू करणार आहोत.

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT