Twitt On Sanjay Raut sakal
मुंबई

Twitt On Sanjay Raut : 'जागे व्हा नाहीतर जनतेची थुंकी झेला', आमदार राजू पाटील यांची शिवसेनेला चपराक

राऊत यांच्या या कृत्यामुळे शिंदे गटात मात्र संतापाचे वातावरण आहे. शनिवारी कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आदि ठिकाणी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत राऊत यांचा निषेध व्यक्त केला.

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

Twitt On Sanjay Raut - शिंदे गटाविषयी प्रश्न विचारताच खासदार संजय राऊत यांनी थुंकण्याची क्रिया केल्याने ते पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. खासदार राऊत यांच्या या कृतीच्या विरोधात आज सर्वत्र शिवसैनिकांनी राऊत यांच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरत आंदोलन केले. गद्दारांचे नाव घेताच माझी जीभ चावली गेली, त्यामुळे मी चावलो असे स्पष्टीकरण राऊत यांनी दिले असले तरी त्यांच्या या कृत्यावर महाविकास आघाडीतील घटक पक्षाने देखील नाराजी व्यक्त केली आहे.

शिवसेनेच्या आंदोलनावर कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मात्र शिवसेनेला ट्विटच्या माध्यमातून चपराक दिली आहे. ''असंख्य समस्या न सोडवता, दडून बसता, पण भरकटलेल्यांवर थुंकायला मात्र तुम्ही रस्त्यावर येता...मग ‘त्यांच्यात’ व तुमच्यात फरक तो काय ?'', ''वेळीच जागे व्हा नाही तर जनतेची थुंकी झेलायला तयार रहा.'' असे ट्विट पाटलांनी केले आहे.

वादग्रस्त विधानांमुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नेहमीच चर्चेत असतात. शिंदे गटाविषयी प्रश्न येताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना तसेच दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना दोन वेळा खासदार राऊत यांनी थुंकण्याची कृती केली. राऊत यांची ही कृती यामुळे वादात सापडली आहे. संजय राऊत यांनी आपल्या या कृत्याविषयी म्हणाले,

गद्दारांचे नाव घेताच माझी जीभ चावली गेली. त्यामुळे मी खरे तर थुंकलो. मात्र गद्दारांना वाटते मी त्यांच्यावरच थुंकलो. हे खरे आहे की महाराष्ट्रातील जनता त्यांच्यावर थुंकत आहे. त्यामुळे सतत आपल्यावर कोणी ना कोणी थुंकत आहे. अशी भिती गद्दारांना वाटत आहे. बेईमान्यांवर वीर सावरकर ही थुंकले होते हा इतिहास आहे. मी तशी कृती केली तर चूक काय ? असे त्यांनी म्हटले.

राऊत यांच्या या कृत्यामुळे शिंदे गटात मात्र संतापाचे वातावरण आहे. शनिवारी कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आदि ठिकाणी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत राऊत यांचा निषेध व्यक्त केला. यावेळी राऊत यांच्या प्रतिमेस जोडे मारत तसेच त्यांच्या प्रतिमेवर शिवसैनिक थुंकत राऊत यांनी केलेल्या कृत्याचा निषेध नोंदवला आहे.

यावर कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी आपली प्रतिक्रीया ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. राऊत यांचे समर्थन ते करत नाही, मात्र शिवसैनिकांच्या या कृतीमुळे त्यांनी शिवसैनिकांना चपराक दिली आहे.

''थुंकारे उडवणाऱ्या कामचुकार केडीएमसीतील सत्ताधाऱ्यांनो, जनतेला भंडावून सोडणाऱ्या पाणीटंचाई, नियोजनशून्य रस्तेबांधणी, वाहतुकीचा बोजवारा या आणि अशा असंख्य समस्या न सोडवता दडून बसता, पण भरकटलेल्यांवर थुंकायला मात्र तुम्ही रस्त्यावर येता, मग ‘त्यांच्यात’ व तुमच्यात फरक तो काय ? वेळीच जागे व्हा नाहीतर जनतेची थुंकी झेलायला तयार रहा.'' मनसे आमदार पाटलांच्या या ट्विटला शिवसैनिक आता काय उत्तर देतात ते पहावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Rathod won in Digras Assembly Election Results 2024: माणिकराव ठाकरेंचा पुन्हा पराभूत, हायव्होल्टेज लढतीत संजय राठोड विजयी

Eknath Shinde : एकनाथ शिंदे महाविकास आघाडीपेक्षा भारी, केलीय आता पुढची तयारी

"त्याने माझ्या तब्येतीची चौकशी केली आणि..." शुटिंगमुळे थकलेल्या सलमानच्या कृतीने भारावली हिना , म्हणाली...

Prakash Solanke won Majalgaon Assembly election 2024 final Result: माजलगावमध्ये अटीतटीच्या लढतीत प्रकाश सोळंके विजयी, शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव

Ballarpur Assembly Constituency Result 2024 : बल्लारपूरमध्ये भाजपचा गुलाल! सुधीर मुनगंटीवारांनी 105969 मतांनी गड राखला

SCROLL FOR NEXT