डोंबिवली - डोंबिवलीतील रिक्षाचालकाला बिर्ला मंदिर येथे जायचे आहे असे सांगत. दर्शन झाल्यावर प्रसादाच्या पेढ्यातून गुंगीचे औषध देत त्याची दोघांनी लुबाडणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विष्णूनगर पोलिसांनी याचा तपास करत सागर पारेख आणि संपतराज पारेख या दोघांना अटक करीत त्यांच्याकडून दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
डोंबिवली पश्चिमेत गरिबाचा वाडा परिसरात रिक्षाचालक राकेश म्हामुणकर हे राहण्यास आहेत. स्टेशन परिसरात रिक्षा चालवून ते आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. रांगेत व्यवसाय करण्यासाठी ते उभे असताना त्यांच्याजवळ दोघे ग्राहक आले.
बिर्ला मंदिर येथे जायचे आहे असे सांगत ते राकेश यांच्या रिक्षात बसले. बिर्ला मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ते पुन्हा रिक्षात बसले. यावेळी त्यांनी राकेश याला प्रसादाचा पेढा खायला दिला. प्रसाद यांना तो पेढा खाल्यानंतर गुंगी आली.
त्यानंतर दोघा प्रवाशांनी राकेश यांची सोन्याची चैन व मोबाईल असा ऐवज लंपास करुन पळ काढला. आपली लुबाडणूक झाल्याचे लक्षात येताच राकेश यांनी डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत याचा शोध सुरु केला.
सीसीटिव्ही फुटेज तसेच गुप्त बातमीदारांमार्फत माहिती घेत पोलिसांनी दोन्ही आरोपींची ओळख पटविली. त्यानंतर सापळा रचत दोघांनाही अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी सोन्याचे दागिने व मोबाईल असा मिळून सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यांनी अशाच पद्धतीने आणखी कोणाची लुबाडणूक केली आहे का ? गुन्हेगारी पार्श्वभूमी काही आहे का ? याचा पोलिस शोध घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.