mumbai university sakal media
मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या पेट परीक्षेच्या वेळापत्रकात बदल; वाचा सविस्तर माहिती

संजीव भागवत

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या पेट (Mumbai university PET exam) (पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षा) परीक्षांच्या वेळापत्रकात बदल (exam timetable changes) करण्यात आला असून सुधारीत वेळापत्रक (New timetable announced) विद्यापीठामार्फत आज जाहीर करण्यात आले आहे. या सुधारीत वेळापत्रकानुसार मानव्यविद्याशाखेच्या परीक्षा १७ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत घेतल्या जाणार आहेत. तर विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेच्या परीक्षा १८ डिसेंबर २०२१ रोजी १० ते १२ या वेळेत घेतल्या जाणार आहेत.

वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा आणि आंतरविद्याशाखेच्या परीक्षा २१ डिसेबंर २०२१ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत होणार असून या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले. पेट परीक्षेला बसणाऱ्या सर्व परीक्षार्थींनी सुधारीत वेळापत्रकाची नोंद घ्यावी असेही त्यांनी सांगितले.

पेट परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये एकूण ४,४९९ एवढ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून २,६५४ एवढ्या मुलींनी तर १,८४५ एवढ्या मुलांनी अर्ज केले आहेत. विद्याशाखानिहाय विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी सर्वाधिक १,९२१ एवढे अर्ज प्राप्त झाले असून त्यानंतर मानव्यविद्याशाखेसाठी १,१३२, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेसाठी ७४५ आणि आंतरविद्याशाखेसाठी ७०१ एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत. एकूण ७९ विषयांसाठी ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी रसायनशास्त्र विषयासाठी सर्वाधिक ४६९ एवढे अर्ज प्राप्त झाले असून त्यापाठोपाठ इंग्रजी या विषयासाठी २२५ एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Constituency: मनसेनं २००९ मध्ये कोणते मतदारसंघ जिंकले होते? ते आमदार आता कुठे आहेत? राज ठाकरेंना पुन्हा यश येणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Tax Evasion: देशात 18,000 बनावट कंपन्या; सरकारची 25,000 कोटी रुपयांची फसवणूक, काय आहे प्रकरण?

शेवटी आईच ती! दिवाळीच्या सुट्ट्या संपवून शूटिंगला परतणाऱ्या सिम्बाला निरोप देताना हमसून रडली माउली, नेटकरी म्हणाले-

Sawantwadi Election : सावंतवाडीत राजकीय 'संशयकल्लोळ'; बंडखोरीमुळे मतदारसंघात पेच, कोण कोणाची मते पळवणार?

SCROLL FOR NEXT