Senate Election aditya Thackeray 
मुंबई

Mumbai University Senate Election 2024 Result: सिनेट निवडणुकीत युवासेनेचा सर्व 10 जागांवर दणदणीत विजय; मातोश्रीवर आज जल्लोष

कार्तिक पुजारी

मुंबई- दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर सिनेटच्या १० जागांचा निकाल जाहीर झाला. यात युवासेनेला सर्व दहा जागांवर दणदणीत विजय मिळाला, निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी भाजपशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या उमेदवारांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

दोन वर्षापासून विविध कारणे पुढे करून सिनेटची निवडणूक रोखून धरणाऱ्या सत्ताधाऱ्यांना या निवडणुकीत युवासेनेला रोखण्यात अपयश आले. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी हा विजय कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा असल्याचे म्हटले आहे. युवासेनेच्या राखीव प्रवर्गातील पाचही जागा आणि खुल्या प्रवर्गातील चार जागांवर युवासेनेने दणदणीत विजय मिळवला आहे.

युवासेनेच्या पदवीधर सिनेटमध्ये दोघांनी सलग तीन वेळा निवडून येण्याचा विक्रम केला आहे. यात डीटीएनटी प्रवर्गातून शशिकांत झोरे आणि खुल्या प्रवर्गातून प्रदीप सावंत यांचा समावेश आहे. सलग दोन वेळा निवडून येण्यात अनुसूचित जाती प्रवर्गातील शीतल शेठ देवरूखकर आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील धनराज कोहचाडे यांचा समावेश आहे.

नव्यानेच युवासेनेकडून मैदानात उतरलेल्या मयूर पांचाळ ओबीसी प्रवर्गातून आणि स्नेहा गवळी महिला प्रवर्गातून विजयी झाल्या. खुल्या प्रवर्गातून किसन सावंत, मिलिंद साटम, परमात्मा यादव, अल्पेश भोईर यांनी अभाविपचा पराभव केला.

आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

सिनेटच्या निवडणुकीत आमच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे. आमच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा हा विजय आहे. असाच विजय मविआ आगामी निवडणुकीत मिळवेल. सत्ताधाऱ्यांनी पराभवाच्या भीतीने दोन वर्षे निवडणुकी लांबवल्या होत्या. याच भीतीमुळे ते राज्यातील विविध निवडणुका पुढे ढकलत आहेत, असं युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची न्यायालयात याचिका

सिनेट निवडणुकीत पनवेलमधील मतदान केंद्रावर युवासेनेच्या उमेदवाराने बोगस पोलिंग एजंट नेमल्याने युवासेनेचे उमेदवार अल्पेश भोईर यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, तसेच निवडणूक निकालाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

उच्च न्यायालयाने याचिकेची दखल घेत मुंबई विद्यापीठाला नोटीस बजावली आहे. जुईनगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजच्या मतदान केंद्रावर युवासेनेचे उमेदवार अल्पेश भोईर यांचा पोलिंग एजंट बोगस असल्याचा आरोप 'अभाविप'ने केला आहे.

विद्यापीठाच्या नियमानुसार पोलिंग एजंट सिनेट निवडणुकीतील मतदार असणे आवश्यक आहे, मात्र या नियमाचे उल्लंघन झाले आहे, त्यामुळे युवासेनेच्या अल्पेश भोईर यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, तसेच मतमोजणीला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी करत अभाविपचे उमेदवार अजिंक्य जाधव यांचे पोलिंग एजंट किरण पांगारे व अभाविपचे ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवणारे उमेदवार राकेश भुजबळ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बन्ना शेख बनली रिया बर्डे...'त्या' बांगलादेशी पॉर्न स्टारबद्दल धक्कादायक खुलासा; राज कुंद्राशीही आहे कनेक्शन

Dharmaveer 2 : खोट बोलावं पण किती? धर्मवीर 2 मधला राज ठाकरेंवरचा 'तो' सीन होतोय प्रचंड ट्रोल

Latest Maharashtra News Live Updates : मराठा, ओबीसी समाजापाठोपाठ आता नाभिक समाजाचे आंदोलन

BB Marathi Voting Trends: सुरज टॉपवर पण सगळ्यात कमी मतं कुणाला? शेवटच्या आठवड्यात हे दोन सदस्य डेंजर झोनमध्ये

IND vs BAN 2nd Test : मोठे अपडेट्स : भारतीय संघ Kanpur स्टेडियमवरून हॉटेलमध्ये परतला; आजचा खेळ होण्यावर शंका

SCROLL FOR NEXT