admission sakal media
मुंबई

पदवी प्रवेशाचा 'या' शाखेकडेच सर्वाधिक कल; सेंट झेवियर्समध्ये अतिरिक्त तुकडी

संजीव भागवत

मुंबई : मुंबई विद्यापीठातील (Mumbai university) पदवी प्रवेशाची (Degree Admission) तिसरी गुणवत्ता यादी (third list) आज सायंकाळी 7 वाजता जाहीर झाली. बारावीत 90 टक्के व त्या दरम्यान गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी (HSC marks) मुंबईतील नामांकित महाविद्यालयात (Mumbai reputed college) कला शाखेत (Arts Faculty) प्रवेश घेण्यासाठी सर्वाधिक पसंती दर्शवली आहे.

मुंबईतील अनेक नामांकित महाविद्यालयात कला शाखेचा कट ऑफ हा नव्वदी पार पोचला आहे. तर वाणिज्य, विज्ञान आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांचा कट ऑफही काही पूर्णांकांनीच घटल्याचे तिसऱ्या गुणवत्ता यादीतून समोर आले आहे. सेंट झेविअर्स महाविद्यालयात यंदा विद्यार्थ्यांनी सर्वाधिक प्रवेशासाठी मागणी केल्यानंतर पदवीच्या प्रथम वर्ष बीएसाठी अतिरिक्त तुकडी सुरू करण्यात आली असल्याची माहिती आज विद्यापीठाकडून देण्यात आली. दरम्यान, झेविअर्स कॉलेजने बीएएमसीजे या अभ्यासक्रमासाठी नवीन तुकडी सुरू केली आहे. मात्र या तुकडीचा कट ऑफही नव्वदीपार असल्याने अनेकांचे झेविअर्समध्ये प्रवेश मिळण्याचे स्वप्न अर्धवट राहणार आहे.

तिसऱ्या गुणवत्ता यादीमध्येही गेल्यावर्षीच्या तुलनेत तीन ते चार टक्क्यांनी वाढ दिसत आहे. यामुळे यंदा बहुतांश विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळवूनही नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळू शकलेला नाही. कला शाखेखालोखाल वाणिज्य शाखा तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. यंदा प्रथमच तिसऱ्या यादीत विज्ञान शाखेचा कट ऑफ हा सुमारे दहा ते बारा टक्क्यांनी वाढलेला दिसत आहे.

गतवर्षी ७५ ते ८० टक्क्यांवर बंद झालेल्या विज्ञान शाखेच्या तिसऱ्या यादीचा कट ऑफ यंदा ८५ ते ९०च्या दरम्यान असल्याचे पाहावयास मिळाले. यंदा इंजिनीअरिंग तसेच वैद्यकीय प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक अद्याप जाहीर न झाल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना नियमित विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेऊन ठवले आहेत. यामुळे इंजिनीअरिंग तसेच वैद्यकीयचे प्रवेश झाल्यानंतर विज्ञान शाखेत करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी मिळू शकणार आहे. मात्र त्यासाठी पुन्हा प्रवेश प्रक्रिया होणार का? याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

तिसऱ्या यादीतील काही कट ऑफ

झेविअर्स महाविद्यालय

बीएसस्सी आयटी - ७७.४४

बीएएमसीजे (नवी तुकडी) - ९१.७२

रुईया महाविद्यालय

बीए (इंग्रजी) - ९४.८३

बीए (सीअँडएम) इंग्रजी : आर्टस् - ९४.८३

बीएस्सी : ८३.३

बायोटेक्नॉलॉजी : ९५.५

पाटकर महाविद्यालय

बॅफ - ७९.८३

बीएससी आयटी - ७३.५

बीएससी कम्प्युटर सायन्स : ७०.६६

बीएमएस - ७९.५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू! ऋषभ पंतवर तब्बल २७ कोटींची बोली

Maharashtra Election Result 2024: विरोधकांचे उरले-सुरले आमदारही सत्तापक्षाच्या संपर्कात; आणखी दोन पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर

Shreyas Iyer IPL Mega Auction 2025 : श्रेयस अय्यर आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला, PBKS ने मोजली तगडी रक्कम

Latest Maharashtra News Updates : विधानसभेचा निकाल अनपेक्षित, कारण वास्तविकता वेगळी होती- जितेंद्र आव्हाड

Jalgaon Jamod Assemly Election 2024 Result : जळगाव जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे यांचा मुंबईत सत्कार

SCROLL FOR NEXT