mumbai unseasonal rain diwali stall sellers weather rain forecast Sakal
मुंबई

Mumbai Unseasonal Rain : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची दमदार हजेरी; दिवाळी साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची तारांबळ

अवकाळी पावसाचा अंदाज नसल्याने दिवाळी साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची तारांबळ उडाली.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - ऐन दिवाळीत शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांच्या उत्साहावर पाणी फिरले आहे. सलग दुसऱ्या दिवशी विजांच्या कडकडाटात पावसाने उपस्थिती लावली. अवकाळी पावसाचा अंदाज नसल्याने दिवाळी साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची तारांबळ उडाली.

संध्याकाळी पाऊस येत असल्याने बच्चे कंपनीला फटाके फोडण्याचा आनंद घेता येत नसल्याने काही से नाराजीचे वातावरण आहे. गुरुवारी आलेल्या पावसाने अनेक भागातील बत्ती गुल झाली होती. झाड पडून काही घरांचे नुकसान झाले तर काही ठिकाणी वाहतुकीला खोळंबा झाल्याचे पहायला मिळाले.

कल्याण-डोंबिवलीतील मुख्य रस्ते आणि बाजारपेठा दिवाळीसाठी लागणाऱ्या साहित्याने सजली आहेत. दरवर्षी दिवाळीच्या महिनाभरापासून दुकानदार साहित्य स्टॉक करून ठेवतात. पंधरा दिवसांपूर्वी पासून शहरातील मुख्य दुकानाच्या पुढे हंगामी स्टॉल थाटून बाजार सजविण्यात आला आहे.

यात उटणे, रांगोळ्या, पणत्या, कंदील, स्टिकर्स, फराळ, विद्युत रोषणाईच्या माळा, फटाके आदी वस्तूंचा समावेश आहे. मात्र पावसाने अचानक गुरुवार पासून हजेरी लावल्यामुळे या हंगामी दुकानदारांची पंचाईत झाली आहे.

शनिवार आणि रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने गिऱ्हाईकांनी दिवाळीची आधीच करून ठेवली आहे. मात्र कालपासून सर्वत्र पावसाने धुमशान घातल्याने गिऱ्हाईकांसह व्यापारी, दुकानदार आणि स्टॉलधारकांसह फेरीवाल्यांचे व्यवसाय पुरते कोलमडून पडल्याचे पहावयास मिळाले. दिवसभर खरेदीसाठी झुंबड उडाली होती.

मात्र सायंकाळ होताच आकाशात ढगांच्या डगगडाटासह पावसाने हजेरी लावल्याने साऱ्यांना आपला बाजार गुंडाळावा लागला. पावसामुळे घरी परतलेला खरेदीदार पुन्हा बाजारात फिरकलाच नाही.

सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे महावितरणने धोका उद्भवू नये यासाठी बऱ्याचश्या भागातील बत्तीच गुल करून टाकली. त्यामुळे घराबाहेर लावलेल्या कंदील आणि विद्युत रोषणाईवर परिमाण झाला. तर दुसरीकडे पावसाच्या हजेरीमुळे हवेत गारवा निर्माण झाला होता.

गुरुवारी पडलेल्या पावसाने कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊसा मुळे 10 घराचे मोठ्या प्रमाण नुकसान व तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. डोंबिवली पश्चिमेतील सम्राट चौक, एव्हरेस्ट सोसायटी परिसरातील जुने मोठ झाड सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे कोसळले.

यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. अग्निशमन दलाने त्वरित ही झाडे छाटून वाहतूक पूर्ववत करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी देखील पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगळ्याचे दिसून आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingre: शरद पवार ईडीला घाबरले नाहीत, तुमच्या नोटिशीला काय घाबरणार! सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना टोला

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Vadgaon Sheri News : पोर्शे अपघात प्रकरणी टिंगरेंनी दिली शरद पवार यांना नोटीस - सुप्रिया सुळे

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SCROLL FOR NEXT