Vande Bharat  
मुंबई

Vande Bharat : वंदे भारताच्या स्वच्छतेसाठी अत्याधुनिक उपकरणांचा वापर ! वाडीबंदर कोचिंग डेपोत सफाई

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भारतातील सर्वात आधुनिक आणि नवीन वैशिष्ट्यांसह सुसज्ज,नवीन पिढीच्या हायस्पीड वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसची देखभाल दुरुस्ती आणि स्वच्छतेचे काम वाडीबंदर कोचिंग डेपोमध्ये करण्यात येत आहे.

नुकताच मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने वंदे भारत ट्रेच्या साफसफाईच्या उपकरणांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.आता अत्याधुनिक मशीनद्वारे वंदे भारत ट्रेनच्या स्वच्छतेचे काम वाडीबंदर कोचिंग डेपो केल्या जात असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

पंतप्रधानांनी २७ जून २०२३ रोजी एकाच वेळी पाच वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर, देशभरात धावणाऱ्या एकूण वंदे भारत ट्रेन्सची संख्या २३ वर पोहचली आहे. महाराष्ट्रात धावणाऱ्या पाच वंदे भारत ट्रेनपैकी मध्य रेल्वेवर सध्या चार वंदे भारत ट्रेन धावत आहेत.

हवाई प्रवास आणि रस्ते प्रवासाच्या तुलनेत वंदे भारत प्रवास हा अधिक किफायतशीर पर्याय भारतीय रेल्वेने उपलब्ध करून दिला आहे. विविध प्रमुख शहरांशी अखंड कनेक्टिव्हिटीचा फायदा केवळ व्यावसायिकांनाच नाही तर पर्यटकांनाही झाला आहे. अशा गाड्यांची देखभाल करणे हे मोठे आव्हान आहे.

मध्य रेल्वे आपल्या वाडीबंदर कोचिंग डेपोमध्ये जागतिक दर्जाच्या ट्रेनची देखभाल करण्याचे काम करत आहे. वंदे भारत हे सध्या मुंबई विभागातील वाडीबंदर कोचिंग डेपोमध्ये ठेवलेले आहे आणि अलीकडेच साफसफाईच्या उपकरणांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. पूर्वी साफसफाई पारंपारिक व्हॅक्यूम क्लिनरद्वारे केली जात होती.

जी अवजड आणि भरपूर विद्युत जोडणी आवश्यक असते. तसेच ते साफसफाईच्या बाबतीतही कुचकामी ठरत होती. आता मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांच्या नेतृत्वाखाली, डेपोने साफसफाईची उपकरणे श्रेणीसुधारित केली आहे.

लवकरच इतरही गाड्या

आता व्हॅक्यूम क्लिनरमध्ये श्रेणीसुधारित केले आहे. आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून धूळ आणि मोडतोड पकडण्यासाठी मजबूत व्हॅक्यूम क्लिनर यंत्र आणले आहे. नवीन उपकरणे खूप हलकी आहेत आणि ती एकट्या व्यक्तीने वाहून नेली जाऊ शकते. 60 मिनिटांपर्यंत बॅटरीवर चालू शकतात.

यात एलसीडी स्क्रीन आहे जी सेकंड बाय सेकंड रन टाइम काउंट डाउन आणि परफॉर्मन्स रिपोर्ट दाखवते. सध्या वंदे भारत डब्यांसाठी उपकरणे वापरली जातात. मुंबई विभाग इतर प्रीमियम गाड्यांमध्ये देखील स्वछता कर्मचार्‍यांना या व्हॅक्यूम क्लीनरसह सुसज्ज करण्याचा विचार करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Crash: निफ्टी आणखी 1,000 अंकांनी घसरू शकतो; शेअर बाजारात सातत्याने का कोसळत आहे?

आज नाही जन्मदिन नाही पुण्यतिथी तरीही गुगलने का बनवला सुप्रसिद्ध गायक केके यांचं डुडल ?

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीला सुरुवात

Firing On School Van: उत्तर प्रदेशात देशाला हादरवणारी घटना! स्कूल व्हॅनवर तरुणांकडून गोळीबार

Chh. Sambhajinagar Assembly Election 2024 : छत्रपती संभाजीनगर ‘वंचित’ मतांमध्येही आघाडी घेणार का?

SCROLL FOR NEXT