मुंबई : मुंबईत लसीकरणाचा (Mumbai corona vaccination) वेग मंदावला आहे. ही गती कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे पालिकेने दोन डोस (two dose) मधला दीर्घ कालावधी गृहित धरला आहे. त्यामुळे, लसीकरणाला गती देण्यासाठी पालिका केंद्र (BMC vaccination center) आणि राज्य सरकारला (mva Government) कोविशील्ड लसीचा (covishield vaccines) कालावधी कमी करण्यासाठी पत्र लिहिणार आहे. या पत्रात पालिका हा कालावधी 84 दिवसांऐवजी कमी करण्याची मागणी करणार आहे.
ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये सर्वाधिक लसीकरण झाले, मात्र ऑक्टोबरमध्ये ही गती मंदावली. गेल्या काही दिवसांपासून दररोज 50 ते 75 हजारांच्या आत लसीकरण होत आहे. पालिका आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या अहवालानुसार, सप्टेंबरच्या तुलनेत 27 ऑक्टोबरपर्यंत 43 टक्के कमी लसीकरण झाले आहे. पालिकेच्या अहवालावर नजर टाकली तर 27 सप्टेंबरपर्यंत मुंबईत लसीचे 29,08,625 डोस देण्यात आले होते, परंतु ऑक्टोबरमध्ये ही संख्या 16,57,678 वर आली.
पालिका लसीकरणाचा वेग मंदावण्याची अनेक कारणे सांगत आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी साांगितले की, सणांमुळे अनेक लोक मुंबईबाहेर आहेत. यासह 98 टक्के लोकांना कोरोनाचा पहिला डोस मिळाला आहे. तर, दुसऱ्या डोसचे बहुतेक लाभार्थी त्यांच्या लसीकरणाची वेळ विसरत आहेत, कारण, कोव्हिशील्ड लसीच्या डोसचा कालावधी जास्त आहे. त्यामुळे, यावर मात करण्यासाठी पालिका हा कालावधी कमी करण्याची तयारी करत आहे. यासाठी पालिका लवकरच केंद्र आणि राज्य सरकारला पत्र पाठवणार असल्याचे काकाणी यांनी सांगितले. या पत्राला ग्रीन सिग्नल मिळताच दुसऱ्या डोसच्या लाभार्थ्यांचा आलेख झपाट्याने वाढेल. दिवाळीनंतर लसीकरणाचा आलेख वाढू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.