Taloja Dumping Ground esakal
मुंबई

Taloja Dumping Ground: मुंबईचा कचरा तळोज्यात! अत्याधुनिक डम्पिंग ग्राऊंडसाठी महापालिकेकडून वेग; तीस हेक्टर जागा अन्..

Mumbai waste Mulund: मुलुंड येथील डम्पिंग ग्राऊंड बंद करण्यात आले आहे; मात्र कांजूरमार्ग व क्षमता संपलेले देवनार डम्पिंग ग्राउंड सुरू आहेत. ही दोन्ही डम्पिंग ग्राउंड बंद करून तळोजा येथे ५२ हेक्टर जमिनीवर डम्पिंग ग्राउंड सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai waste planning: शहरातील कचरा सध्या देवनार आणि कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. देवनारची क्षमता संपल्याने आता नवी मुंबईतल्या तळोजा येथील ५२ हेक्टर जागेवर मुंबई महापालिका अत्याधुनिक डम्पिंग ग्राउंड उभारणार असून ३० हेक्टर जागा ताब्यात घेण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेने याबाबतची प्रक्रिया सुरू केली आहे. उर्वरित २२ हेक्टर जागेचा ताबा, परवानग्या मिळाल्यानंतर इतर प्रक्रिया पूर्ण करून तळोजा डम्पिंग ग्राउंडचे काम पूर्ण करण्यात येईल. देवनार डम्पिंग ग्राउंडवरील ६०० टन कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेने ९० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

मुलुंड येथील डम्पिंग ग्राऊंड बंद करण्यात आले आहे; मात्र कांजूरमार्ग व क्षमता संपलेले देवनार डम्पिंग ग्राउंड सुरू आहेत. ही दोन्ही डम्पिंग ग्राउंड बंद करून तळोजा येथे ५२ हेक्टर जमिनीवर डम्पिंग ग्राउंड सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

देवनार डम्पिंगवरील कचऱ्यावर प्रक्रिया करून खत आणि वीजनिर्मिती करावी आणि मुंबईला डम्पिंगमुक्त करावे, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईबाहेर डम्पिंग ग्राउंडचा शोध सुरू असून तळोजा येथील जागेवर डम्पिंग गाउंड सुरू करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू आहे.

दररोज ६,५०० टन कचरा

मुंबईत दररोज सुमारे ६,००० ते ६,५०० हजार मेट्रिक टन कचरा तयार होतो. मुलुंड येथील डम्पिंग ग्राउंड बंद झाले असून कांजूर व देवनार येथील डम्पिंग सुरू आहेत. यातील कांजूर येथे कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते. मात्र, क्षमता संपलेल्या देवनार डम्पिंग ग्राउंडवर मुंबईतील कचरा टाकला जात असून तेथे कचऱ्यावर प्रक्रिया केली जात नाही. ही दोन्ही डम्पिंग ग्राउंड नागरी वसाहतीपासून जवळ असल्याने येथील रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

अंबरनाथ येथे डम्पिंगच्या जागेला विरोध

अंबरनाथ तालुक्यातील करवले गावातील जागेवर मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज वास्तव्यास आहे. त्यांनी डम्पिंग ग्राउंडला विरोध केल्याने येथे डम्पिंग ग्राउंड उभे करण्याबाबतचा निर्णय मागे पडला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT