मुंबई : मुंबई इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनल ( Mumbai International Cruise Terminal ) प्रकल्पामुळे मुंबई आगामी काही वर्षात देशाची क्रूझ कॅपिटल म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा (Rajiv Jalota) यांनी आज येथे व्यक्त केला. या टर्मिनलमुळे एकावेळी पाच ते सहा हजार क्रूज प्रवासी (Cruise commuters) हाताळले जातील. सन २०४० ते ४२ मध्ये देशात क्रूज मधून ४० लाख प्रवासी येण्याची अपेक्षा आहे. त्यातील तीस लाख प्रवासी मुंबई टर्मिनल मध्ये येतील, असेही ते म्हणाले.
नैसर्गिक वायूच्या तरंगत्या साठवणूक प्रकल्पाबाबतही त्यांनी माहिती दिली. यामुळे 50 लाख मेट्रीक टन नैसर्गिक वायू मुंबई आणि पश्चिम भारतासाठी उपलब्ध होईल. या परिसरात सध्या नैसर्गिक वायूची मागणी दोन ते तीन कोटी मेट्रिक टन आहे. मात्र त्यातील जेमतेम 80 लाख मेट्रिक टन वायू सध्या उपलब्ध आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील नैसर्गिक वायूची सगळी गरज पूर्ण होईल असेही यावेळी सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.