मुंबई : कोरोनाचा सर्वाधिक प्रार्दुभाव हा मुंबईत झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय. अशातच लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु आहे. या टप्प्यात संचारबंदीच्या आदेशात शिथिलता मिळाली आहे. त्यामुळे राज्यासह विशेष करुन मुंबईत कोविडपासून सुरक्षित असलेल्या चहाच्या टपऱ्या सुरु करण्याचं नियोजन टी अँड कॉफी असोसिएनतर्फे करण्यात आलं आहे. येत्या काही दिवसांत चहाविक्रेत्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केले जातील आणि त्यानंतर मुंबईकर टपरीवरच्या चहाचा आस्वाद घेऊ शकतील.
लॉकडाऊनच्या काळात अनेक विक्रेते आपआपल्या घरी परतले आहेत. सध्या मुंबईत जवळपास 12 हजारांहून अधिक चहाविक्रेते आहेत. मात्र त्यापैकी काही चहाविक्रेते भूमिपुत्र आहेत. हे सर्वजण आपला व्यवसाय सावरण्यासाठी संचारबंदी शिथिल होण्याच्या आदेशाची वाट पाहत होते.
लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात केंद्र सरकार तसंच राज्य सरकारकडून काही गोष्टींमध्ये शिथिलता आणण्याबाबत सकारात्मक इशारा देण्यास सुरुवात केली. पण यापुढे कुठलेही खाद्यव्यवसाय सुरु करत असताना ग्राहकांची मागणी ग्राह्य धरावी लागणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
चहाविक्रेत्यांसाठी विशेष नियमावली
कोरोना व्हायरसचा वाढता फैलाव बघता या संसर्गाच्या भीतीमुळे नागरिक आमच्याकडे येतील का, असा प्रश्न चहा विक्रेत्यांना पडला होता. त्यावर तोडगा म्हणून चहाविक्रेत्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या टी अँड कॉफी असोसिएशनने कोवि़ड विशेष मार्गदर्शक तत्त्वे (नियमावली) तयार केली असल्याचं असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद वाकोडे यांनी सांगितलं.
चहाविक्रेत्यांना देणार प्रमाणपत्र
या नियमावलीत असोसिएशनने नियुक्त केलेली डॉक्टरची टीम चहाविक्रेत्यांची तपासणी करेल आणि त्यांना फिट असल्याचं प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रमाणपत्र मिळाल्यावरच सदर विक्रेत्याला आपला व्यवसाय सुरु करण्याची परवानगी मिळेल. तसंच सोशल डिस्टन्सिंग राखूनच चहाची विक्री कशी करावी याबाबत या नियमावलीत सूचना देण्यात येतील. विशेष म्हणजे, या पुढे प्रत्येक नोंदणीकृत चहाविक्रेत्यास ड्रेसकोड बंधनकारक असणार आहे.
चहाचा व्यवसाय सांभाळ असताना आमच्या ग्राहकांचे आरोग्य जपणं हे निश्चितच आमचं पहिलं प्राधान्य असेल. सुरुवातीच्या काळात इम्युनिटी पावर वाढवण्याबाबत आयुष मंत्रालयानं शिफारस केल्यानुसार ब्लॅक मसाला चहाची विक्री करण्याबाबत विक्रेत्यांना प्राथमिक सूचना देण्यात आल्या असून वेळोवेळी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून प्रशिक्षणही दिलं जाणार असल्याचं प्रमोद वाकोडे यांनी सांगितलं.
चहाविक्रेत्यासाठी असे असतील नियम
काचेच्या ग्लासऐवजी पेपर ग्लास वापरण्याला प्राधान्य.
चहा केंद्राच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ असणे आवश्यक.
चहाविक्रेत्यानं स्वतः मास्क, हातमोजे परिधान केलेले असावे.
ग्राहकाला मास्कबाबत आग्रह करावा.
सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन करावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.