AC-Local 
मुंबई

तुम्हाला AC लोकल का हवी? मध्य रेल्वेने सुरु केला सर्वे

AC लोकल सेवेबद्दल मध्य रेल्वेचे प्रवाशांना प्रश्न

दीनानाथ परब

मुंबई: मुंबईत उपनगरीय रेल्वे मार्गावर धावणाऱ्या AC लोकलबद्दल प्रवाशांची मतं जाणून घेण्यासाठी मध्य रेल्वेने (Central Railway) सर्वेक्षण सुरु केलं आहे. मध्य रेल्वेच्या टि्वटर हँडलवर एक गुगल फॉर्म (google form) पोस्ट करण्यात आला आहे. त्या फॉर्ममध्ये प्रवाशांचा फिडबॅक (feedback) जाणून घेण्यासाठी विविध प्रश्न विचारण्यात आले आहेत. (Mumbaikars Central Railway wants your feedback on AC local)

आम्ही तुमचं ऐकतोय, इथे क्लिक करा असे टि्वटरवरील संदेशात मध्य रेल्वेने म्हटलं आहे. तुमच्यासाठी AC लोकलची कुठली वेळ योग्य आहे?, कुठल्या स्थानकाचा तुम्ही सर्वाधिक वापर करता? असे काही प्रश्न या सर्वेक्षणाच्या फॉर्ममधुन प्रवाशांना विचारण्यात आले आहेत. नाव, वय, लिंग असे सामान्य प्रश्न सोडल्यास तुम्हाला AC लोकलची गरज का आहे? असा प्रश्न प्रवाशांना विचारला आहे.

कुठल्या वेळेत एसी ट्रेन सर्वात जास्त बरी पडते? एसी लोकलच्या तिकिट दरात बदल झाला पाहिजे का? फर्स्ट क्लासपेक्षा एसी लोकलचे तिकिट दर किती टक्के जास्त असावेत? असे प्रश्न प्रवाशांना विचारण्यात आले आहेत. प्रश्नोत्तर सोडल्यास मध्य रेल्वेने प्रवाशांनाही ५० शब्दात सल्ला देण्यासही सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT