मुंबई: कोरोना व्हायरस आणि लॉकडाउनमुळे (lockdown) सध्या सर्व शाळा-महाविद्यालयांचे ऑनलाइन वर्ग सुरु आहेत. मुंबईतील बहुतांश कॉलेजेसचे (Mumbai colleges) ऑनलाइन लेक्चर १५ जूनपासून सुरु झाले आहेत. पण मुंबईतील प्रसिद्ध माटुंग्याच्या डी.जी. रुपारेल कॉलेजमधील (ruparel college) १ हजार विद्यार्थी अजूनही ऑनलाइन लेक्चरच्या (online lecture) प्रतिक्षेत आहेत. बीएमएस, बीएससी-आयटी, BSC- कॉम्प्युटर सायन्सचे लेक्चर अजून सुरु झालेले नाहीत. चालू शैक्षणिक सत्रासाठी कॉलेजने अजून शिक्षकांची नियुक्ती केलेली नाही. (Mumbais famous matunga Ruparel college 1,000 students still await start of online class dmp82)
विद्यार्थ्यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाला प्रवेश घेतला असून फी सुद्धा भरली आहे. अन्य कॉलेजेसचे ३० दिवसांचे शैक्षणिक वर्ग पूर्ण झाले आहेत. मुंबई विद्यापीठाने कॉमन परिक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पण अजून ऑनलाइन वर्ग सुरु होत नसल्याने रुपारेल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस सेल्फ फायनान्स कोर्सच्या शिक्षकांची सेवा खंडीत केली जाते आणि शैक्षणिक वर्ष सुरु होताना, फेरनियुक्ती केली जाते. यावर्षी नियुक्ती प्रक्रियेला विलंब झाला आहे, असे कॉलेजच्या अधिकाऱ्याने सांगितले.
शिक्षकांकडून अर्ज मागवण्यासाठी २२ जूनला जाहीरात प्रसिद्ध झाली आहे. साधारणत: मे महिन्यात अशी जाहीरात प्रसिद्ध होते. या आठवड्यात मुलाखती झाल्या असून लवकरच ऑनलाइन वर्ग सुरु होतील, असे अधिकाऱ्याने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.