मुंबई : राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून कोविड19 ची ९ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झालीये. सोमवारी राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग आणि मृत्यू या दोन्हीमध्ये घट झालीय. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या रोज १ हजारपेक्षा अधिक वाढत आहे. मात्र, मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला आहे.
अनेक विभागात कोरोना नियंत्रणात आलाय. मात्र अजूनही मुंबईतील काही विभागांमध्ये कोरोना रुग्णसंख्येयत मोठी वाढ होतेय. अंधेरी पूर्व भागात रुग्णांची संख्या आकडा ७ हजारांच्या वर गेली आहे. म्हणजेच शहरातील प्रशासकीय प्रभागांपैकी 'के ईस्ट' हा ७ हजार प्रकरणांचा आकडा ओलांडणारा पहिला प्रभाग बनला आहे. चार प्रभागात प्रत्येकी ६ हजारपेक्षा जास्त रुग्ण आहेत. तर अन्य तीन प्रभागांमध्ये प्रत्येकी ५ हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत.
मोठी बातमी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन पुन्हा पुढे ढकललं, कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय
अंधेरी पूर्वमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अंधेरी पूर्वमधील एकूण रुग्णसंख्या ७,००५ झाली आहे. अंधेरी पूर्वेत मृत्यूही सर्वाधिक ४४२ आहेत.
बीएमसीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २५ जुलैपर्यंत मालाडमधील कोरोना रुग्णांची संख्या ६,५८३ वर गेली आहे. तर दहिसरमध्ये २६ जुलैपर्यंत कोरोनाचे २,६१६ रूग्ण आढळून आलेत. २६ जुलैपर्यंत बोरिवलीमध्ये कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४,९९४ वर पोहोचली आहे. २५ जुलैपर्यंत कांदिवलीमधील कोरोना रूग्णांची एकूण संख्या ४,७८० झालीय.
मुंबईत दररोज कोरोनाची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या १,००० एवढी आहे आणि मृत्यूदर ५७ वरुन ३९ दिवसांवर आला आहे. सोमवारी राज्यात नोंदवलेल्या ७,९२४ नवीन घटनांपैकी १,०२१ हे मुंबई शहरातील आहेत. ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण येथे प्रत्येकी 300 हून अधिक प्रकरणे नोंदली गेली.
मोठी बातमी - इथली पावभाजी तुम्ही खाल्लीच असेल ! मुंबईतील प्रसिद्ध पावभाजी दुकानातून 100 किलो बटर आणि चीज चोरीला...
एकूण १.४७ लाख कोरोनाबाधित रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यानं सांगितले की, राज्यातील पुनर्प्राप्तीचा (recovery rate) दर २ टक्क्यांनी वाढून ५८ टक्के झालाय. सोमवारी राज्यभरात ८,७०६ रूग्ण बरे झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं. तर मुंबईत मुंबईतील १,७०६ रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. शहरातील संक्रमणाचे डबलिंग रेट ६८ दिवस आहेत.
in mumbais K east ward covid patient count crossed mark of seven thousand
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.