पालिकेचे घरोघरी क्षय सर्वेक्षण  sakal
मुंबई

पालिकेचे घरोघरी क्षय सर्वेक्षण

१७ लाख नागरिकांमधून २४९ रुग्णांची नोंद; २४ एमडीआर

भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत कोरोनासह ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका कायम असताना पालिकेने इतर गंभीर आजारांवरही लक्ष केंद्रित केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पालिकेने क्षयरुग्णांकडे मोर्चा वळवला आहे. १५ ते २५ नोव्हेंबर २०२१ दरम्यान पालिकेकडून राबवण्यात आलेल्या सर्वेक्षणात २४९ नवीन क्षयाचे रुग्ण सापडले आहेत. त्यातील २४ एमडीआर रुग्ण आहेत.पालिकेने मुंबईतील २४ क्षयरोग जिल्ह्यांतील ५४ टीबी युनिट परिसरांमधील एकूण १७ लाख ७ हजार ४२ नागरिकांची तपासणी केली. त्यात ११ हजार ४१६ संशयित क्षयरुग्ण सापडले होते. पालिकेने केलेल्या तपासणीत २४९ नागरिकांना क्षयाचा संसर्ग झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. त्यापैकी २४८ रुग्णांवर  उपचार सुरू आहेत. नोव्हेंबरमधील दहा दिवसांत महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या चमूने घरोघरी जाऊन साधारण १७ लाख नागरिकांची तपासणी केली. सकाळी नऊ ते सायंकाळी चारच्या दरम्यान सर्वेक्षण करण्यात आले. १५ ते २५ नोव्हेंबर २०२१ दरम्यान स्पेशल सक्रिय रुग्ण शोधमोहीम असे वर्षाचे पहिले विशेष क्षयरोग तपासणी अभियान महापालिकेने राबवले.

क्षयरोगाची बाधा झालेल्यांनी नियमित औषधोपचाराचा कोर्स पूर्ण केल्यास तो बरा होऊ शकतो. मात्र त्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेल्या पद्धतीनेच औषधोपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

चाचणी करून घेण्याचे आवाहन

नव्या २४९ क्षयरुग्णांपैकी २४ जण एमडीआर म्हणजेच ज्यांच्यावर कोणत्याही औषधांचा परिणाम होत नाही असे आहेत. इतर क्षयाचे रुग्ण आहेत. मुंबईतील एकूण क्षयरुग्णांपैकी १० टक्के एमडीआर असतात, असे महापालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी डाॅ. प्रणिता टिपरे यांनी सांगितले. लक्षणे आढळल्यास संबंधितांनी तातडीने महापालिकेच्या वा सरकारी रुग्णालयातून क्षयरोगाची चाचणी करून घ्यावी. ती पूर्णपणे मोफत आहे. कुटुंबामध्ये एखाद्यास क्षयरोगाची बाधा असल्याचा इतिहास आहे किंवा ज्यांना यापूर्वी त्याची बाधा झाली आहे, अशा व्यक्तींनी लक्षणांबाबत अधिक जागरूक असणे अत्यंत गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या.

१७ लाख नागरिकांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. त्यातून २४९ नवीन क्षयरुग्ण सापडले. त्यातील १० टक्के रुग्ण एमडीआर आहेत. ठरावीक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले गेले. दररोज वेगवेगळ्या स्तरावर काम केले जात आहे. नवीन रुग्ण दररोज शोधले जातात.

- डॉ. प्रणिता टिपरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, महापालिका

काय आहेत क्षय लक्षणे?

  • १४ दिवसांपेक्षा अधिक काळ खोकला

  • दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ ताप

  • सायंकाळच्या वेळेस ताप येणे

  • लक्षणीय स्वरूपात वजन कमी होणे

  • थुंकीतून रक्त पडणे

  • छातीत दुखणे आणि मानेवर सूज असणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शिवसेना उबाठा गटाचे बाळा नर विजयी

Ambernath Assembly Election 2024 Result Live: अंबरनाथमध्ये बालाजी किणीकरांचा विजयी चौकार; शिवसेनेचे राजेश वानखेडे चितपट

SCROLL FOR NEXT