mumbai-municipal-corporation sakal
मुंबई

मुंबईत सिनेमा, नाट्यगृहांच्या मनोरंजन कर वाढीचा पालिकेचा प्रस्ताव

मुंबई महानगरपालिकेकडून दरवर्षी मनोरंजन करामध्ये सुधारणा करण्यात येते. मुंबई महापालिका आगामी वर्षासाठी थिएटर आणि नाट्यगृहांसठी करात वाढ करण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई महानगरपालिकेकडून दरवर्षी मनोरंजन करामध्ये सुधारणा करण्यात येते. मुंबई महापालिका आगामी वर्षासाठी थिएटर आणि नाट्यगृहांसठी करात वाढ करण्यात येणार आहे.

मुंबई - मुंबई महानगरपालिकेकडून दरवर्षी मनोरंजन करामध्ये सुधारणा करण्यात येते. मुंबई महापालिका आगामी वर्षासाठी थिएटर आणि नाट्यगृहांसठी करात वाढ करण्यात येणार आहे. या मनोरंजन करवाढीचा प्रस्ताव आता पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. आयुक्तांच्या मंजुरीनंतरच नव्याने कर आकारणीसाठीच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. आयुक्तांच्या मंजुरीनंतर पालिका प्रशासनाकडून या कर वसुलीबाबतची पुढील प्रक्रिया सुरू होईल. मुंबई महानगरपालिका अधिनियमानुसार हे दर निश्चित केलेल्या दरांपेक्षा अधिक अंमलात आणता येत नाहीत. त्यामुळेच नव्या दरांचा प्रस्ताव लवकरच पालिकेकडून मंजुर होण्याची शक्यता आहे.

मुंबई महानगरपालिकेकडे चित्रपटांचे थिएटर, नाट्यगृह, सर्कस यासारख्या गोष्टींसाठी मनोरंजन कर हा पालिकेकडून आकारण्यात येतो. आर्थिक वर्ष २०१५-१६ साठी थिएटर करामध्ये १० टक्के वाढीचा प्रस्ताव पालिकेने मंजुर केला होता. पालिकेने हा प्रस्ताव नगर विकासाची परवानगी मिळाल्यावर संमत केला होता. परंतु गेल्या काही वर्षात कोरोनाच्या कालावधीमुळे राज्य सरकारने हा कर वसुलीसाठी परवानगी दिली नव्हती. त्यामुळे पालिका आताही २०१५-१६ च्या वर्षानुसारच मनोरंजन करवसुली करत आहे. आता पालिकेने पुन्हा एकदा या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यासाठीची सुरूवात केली आहे.

पालिकेच्या प्रस्तावानुसार २०२३ ते २०२४ या कालावधीत शेड्युल्ड ग्रुप सी मध्ये जुन्या दरानुसार थिएटरचा कर निश्चित करण्यासाठीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये २०२२-२३ मध्ये मुंबईत प्रदर्शित झालेली मराठी, गुजराती चित्रपट, मराठी नाटक, मोनोलॉग यासाठी सूट देण्यात आली होती. त्यामुळे २०१५ च्या आधारावर सुधारीत दरपत्रकाला मंजुरी मिळाल्यास नवे दर लवकरच लागू होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT