Murud Beach Sakal
मुंबई

Murud Sea: मुरूडचा समुद्र किनारा होणार एकदम चकाचक ; पर्यटकांना घेता येणार आनंद

मेघराज जाधव

Murud Sea: तालुक्‍याच्या आर्थिक विकासासाठी मुरूडमधील पर्यटनाला चालना देणे गरजेचे आहे. यातूनच रोजगारनिर्मिती होऊ शकते. त्यासाठी पर्यटकांना लागणाऱ्या सोयी-सुविधांची उपलब्ध करून देण्याचा प्रयत्‍न नगरपरिषदेकडून सुरू आहे. पहिल्‍या टप्प्यात समुद्रकिनाऱ्याचे सुशोभीकरण करण्याबरोबरच वॉकिंग ट्रॅक, स्वच्‍छतागृह आणि सर्वांत महत्त्वाचे वाहनतळाची उभारणी करण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात सुरुची वने पुनर्स्थापित करण्यात येणार आहे.

समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरणासाठी आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नांतून सुमारे १५ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. व्ही.डी.के.कंपनीच्या माध्यमातून काम वेगात सुरूही झाले आहे. पर्यटकांची पसंती हिरवाईने नटलेल्या काशीद बीच, ऐतिहासिक जंजिरा, पद्मदुर्ग, मुरूडचा स्वच्छ समुद्र किनारा, शामराज गड, श्री दत्त मंदिर, इदगाह, खोकरीचे गुंबज, फणसाड अभयारण्य, बौद्धकालीन कुडा-मांदाडची लेणी आदी ठिकाणाला आहे. ही ठिकाणे पाहण्यासाठी मुरूडमध्ये दरवर्षी पाच लाखांहून अधिक पर्यटक येतात. उल्लेखनीय बाब म्हणजे ताजी मासळी व गोडी माडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते.

उधाणामुळे धूप झाल्याने मुरूडचा किनारा ओसाड झाला आहे. तीन वर्षांपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळात किनाऱ्यालगतचे अनेक सुरुची झाडे उन्मळून पडली. जिल्हा परिषद विश्रामगृह ते एमटीडीसी विश्रामबागेपर्यंत दगडी बांध नावापुरताच उरला होता. किनाऱ्याची धूप रोखण्यासाठी ४० वर्षांपूर्वी सामाजिक वनीकरण योजनेतून सुरुची आणि नारळी-पोफळीच्या झाडांची लागवड केली होती. मात्र, बंधाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने किनाऱ्याची दैनावस्था झाली.

मुरूडच्या समुद्रकिनारी १५ वर्षांपूर्वी सुरुच्या वनात नाना-नानी पार्क आणि लहान मुलांसाठी मिनी ट्रेन सुरू केली होती. स्थानिकांना रोजगार मिळावा, यासाठी स्टॉलही बांधण्याचा प्रयत्न होता; परंतु निधीअभावी किनारपट्टी सागरी नियमन (सीआरझेड) कायद्याच्या कचाट्यात सापडल्याने प्रकल्प बारगळला.

शहरात अनेक विकासकामे झाली आहेत. त्यामध्ये किनारा सुशोभीकरणाचा विषय अनेक वर्ष प्रलंबित होता. नगरपरिषदेने मेरिटाईम बोर्डाकडे किनारा सुशोभीकरणासाठी पाठपुरावा केला. अलिकडे समुद्रकिनारा सुशोभीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. जानेवारी २०२४ अखेर हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे मुरूडमधील पर्यटनाचा टक्का खात्रीने वाढेल. परिणामी, स्थानिकांना रोजगाराच्या आणखी संधी उपलब्ध होतील, असे मत व्यक्त होत आहे.

मुरूड समुद्र किनाऱ्याच्या सुशोभीकरण कामासाठी ११.४४ कोटींच्या निधीची तरतूद केली आहेत. यात वॉकिंग ट्रॅकसह २०० वाहनांच्या पार्किंगची सुविधा आणि पर्यटकांना बसण्यासाठी आसनव्यवस्थेचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी चार कोटींचा निधी दिला आहे. किनारा सुशोभीकरणासह सुरुची वने पुनर्स्थापित करण्यात येणार आहे.

- पंकज भुसे, मुख्याधिकारी, मुरूड

मुरूड समुद्रकिनारी संपूर्ण सुशोभीकरण पूर्ण झाल्यानंतर आणि वाहनतळाची सुविधा उपलब्ध होताच पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढेल. यातून पर्यटन व्यवसायाला गती मिळेल.

- अतिक खतीब, माजी उपनगराध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT