Ganpati festival sakal media
मुंबई

गणेशोत्सव मंडळांपुढे परवानगीचे विघ्न ? महापालिका आयुक्तांना पत्र

समीर सुर्वे

मुंबई : राज्य सरकारच्या नियमानुसार (MVA Government rules) गणेशोत्सव (Ganpati festival) साजारा करण्या बरोबर नेमही प्रमाणे मंडप बांधण्यासाठी (decorations) परवानगी मागितली जात आहे. मात्र,काही भागात स्थानिक पालिकाप्रशासन (bmc) आणि पोलिसांकडून (police) परवानगी (permission) घेण्यात अडथळे येत आहेत. तसेच, राज्य सरकारने ठरवून दिल्या व्यतिरीक्तही काही हमीपत्र लिहून मागितली जात आहे. त्यामुळे यावर तत्काळ तोडगा काढण्याची मागणी मुंबई सार्वजनिक गणेशात्सव समितीने महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal singh chahal) यांना पत्र पाठवून केली आहे.

कोविडच्या पाश्‍र्वभुमीवर गेल्या वर्षीच्या नियमानुसार यंदाही गणेशोत्सव साजरा करायचा आहे.तसेच,सार्वजनिक मंडळांना गेल्या वर्षीच्या नियमानुसार परवानगी मिळणार आहे.गेल्या वर्षी ज्या मंडळांना परवानगी मिळाली त्यांना यावर्षी विना अडथळा परवानगी देण्याचे पालिकेकडून जाहीर करण्यात आले होते.मात्र,पालिकेकडून परवानगी मिळाल्यानंतर पोलिसांकडून परवानगी नाकारली जात आहे.अशी नाराजी समन्वय समितीने व्यक्त केली आहे.तसेच,काही ठिकाणी पालिकेच्या प्रभाग कार्यालयांकडून ठरलेल्या व्यतिरीक्त हमीपत्र लिहून मागितली जात आहेत.काही ठिकाणी गणपती मुर्तीला हार फुले प्रसाद अर्पण करणारा नाही असे हमीपत्र लिहून मागितले जात आहे. काही भागात ही समस्या प्रकर्षाने जाणवत असल्याचेही समितीने आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात नमुद केले आहे.

दहिसर मध्येही परवानगी नाही

पालिकेच्या टी मुलूंड आणि आर-उत्तर दहिसर विभागात अधिकार्यांमध्ये संभ्रम असल्याचा दावाही समन्वय समितीने केला आहे.व्यावसायिक जाहिराती स्वीकारायला परवानगी असतानाही मुलूंड मधील अधिकार्याकडून जाहिराती स्विकारल्यास दंडात्मक कारवाई कारवाईचा इशारा दिला जात आहे.दहिसर विभागात एकाही मंडळांना अजूनही परवानगी मिळालेली नाही. प्रत्येक दिवशी टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

Ashok Chavhan : ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला.....अशोक चव्हाण यांची बाळासाहेब थोरात आणि देशमुखांवर खोचक टीका

Sangamner Result: संगमनेरमध्ये पराभवाचा बदला पराभवानेच! ४० वर्षांची कारकीर्द ४१ वर्षांच्या तरुणाने संपवली; नेमकं काय घडलं?

Zimbabwe beat Pakistan: यांना झिम्बाब्वेने हरवले... पाकिस्तानचे ६ फलंदाज ६० धावांत तंबूत, मोहम्मद रिझवाच्या संघाची गेली लाज

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: मुंबई इंडियन्सने 'या' अनकॅप्ड खेळाडूसाठी वापरलं एकमेव RTM कार्ड

SCROLL FOR NEXT