MVA Protest Mumbai Jode Maro Andolan Esakal
मुंबई

MVA Protest Mumbai: पवार, ठाकरेंचा महायुतीवर हल्लाबोल, जोडे मारो आंदोलनात काय काय घडलं?

Shivaji Maharaj Statue: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीने (MVA Protest Mumbai) काढलेल्या निषेध मोर्चामुळे मुंबई पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त ठेवला आहे.

आशुतोष मसगौंडे

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेचा मुद्दा जोर धरत आहे. याप्रकरणी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही माफी मागितली आहे. पीएम मोदींच्या माफीनाम्यानंतर हे प्रकरण शांत होण्याऐवजी अधिकच तापले.

महाराष्ट्र सरकारने तपासासाठी एसआयटी स्थापन केली असतानाच या प्रकरणाबाबत 'महाविकास आघाडीने' सरकारविरोधात आघाडी उघडली आहे.

महाविकास आघाडीने आज मुंबईत जोडे मारो आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. विरोधकांच्या या विरोधाला प्रत्युत्तर देण्यासाठी सत्ताधारी भाजप वेगळी निदर्शने करत आहे.

दरम्यान सध्या गेट वे ऑफ इंडियावर माजी कृषी मंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार शाहू महाराज यांनी हजेरी लावली आहे.

यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुतळ्या दुर्घटनेप्रकरणी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, हे सरकार ज्या ज्या गोष्टीला हात लावते त्याचा सत्यानाश होतो. तर शरद पवाप यांनीही या प्रकरणी संताप व्यक्त केला.

यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार छत्रपती शाहू महाराज यांनीही मनोगत व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली माफी

दरम्यान या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागीतली आहे.

"जे छत्रपती शिवाजी महाराजांना आपले दैवत मानतात त्यांचे मन या घटनेमुळे दुखावले गेले आहे, मी त्यांची डोके टेकवून माफी मागतो. आमली मूल्ये वेगळी असतात. आमच्यासाठी आमच्या दैवतापेक्षा काहीही मोठे नाही," असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.

फडणवीस काय म्हणाले?

शिवाजी महाराज पुतळा कोसळण्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने मोर्चा काढल्यानंतर रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे आंदोलन पूर्णपणे राजकीय असून एमव्हीए किंवा काँग्रेसने, छत्रपती शिवरायांचा कधीही आदर केला नाही.

"हे आंदोलन पूर्णपणे राजकीय आहे. महाविकास आघाडी असो वा काँग्रेस पक्ष, त्यांनी कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर केला नाही. नेहरूजींनी द डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. काँग्रेस आणि एमव्हीए त्याबद्दल माफी मागतील का? मध्य प्रदेशात तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोझरच्या सहाय्याने पाडला, यासाठी काँग्रेसने माफी मागितली का?" अशी टीका उपमुख्यमंत्री म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT