मुंबई : कोरोनामुळे देशाची अर्थव्यवस्था डळमळीत होत आहे. त्यामुळे भविष्यात आपल्या नोकऱ्या राहतील की नाही, त्या परिस्थितीला कसे सामोरे जायचे, अशा चिंतेने आता लोकांना ग्रासले आहे. यामुळे लोकांमध्ये मानसिक ताण वाढत आहे. त्यामुळे अनेकजण समुपदेशन करुन घेत आहेत. लॉकडाऊनच्या काळात हेल्पलाईनवर अशी प्रकरणे हाताळण्याचे प्रमाण 70 ते 80 टक्के आहे. यामध्ये सर्वाधिक तणावाखाली 18 ते 25 वयोगटातील तरुण आहेत.
कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर ताण आला आहे. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना नोकरीची शाश्वती राहिली नाही. परदेशात राहणाऱ्यांना नोकरी गेल्यास परदेशात किती दिवस राहू शकेल, माझा व्हिसाचे काय, परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे भविष्य काय? अशा अनेक समस्यांना लोक तोंड देत आहे. त्यामुळे ते मानसिक ताणात सतत वावरत आहे, अशी माहिती मुंबई विद्यापीठा मानसशास्त्र विभागाने सुरू केलेल्या हेल्पलाईनचे प्रमुख डॉ. विवेक बेल्हेकर यांनी दिली.
लॉकडाऊननंतरची परिस्थिती कशी असेल, आर्थिक संकट येईल का? याची भीती लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. भविष्याच्या चिंतेबाबत सर्वाधिक तणावाखाली 18 ते 25 वयोगाटील तरूण आहे. यामध्ये माझे शैक्षणिक वर्षाचे भवितव्य काय असेल? सद्यपरिस्थितीत पालक आपला शैक्षणिक खर्च करतील का? शिक्षण झाल्यावर नोकरी मिळणार का? नुकतेच नोकरीला लागलेले तरुणांना आपली ही नोकरी टिकेल का?, असे प्रश्न तरुणांना पडले आहे. त्यामुळे त्यांचावर मानसिक ताण वाढत आहेत. पूर्वीपेक्षा आता येणारी प्रकरणे गंभीर आहेत. त्यामुळे या प्रकरणांचे वैयक्तिक मुल्यांकन करण्याचे काम सुरू आहे, असे बेल्हेकर यांनी सांगितले.
---
अर्थव्यवस्थेच्या अनिश्चितेमुळे लोकांवरील मानसिक ताण वाढत आहे. अनेकांना नैराश्याचा सामना करावा लागतो. त्यामुळे तरुणवर्ग लॉकडाऊनमध्ये व्यसनाकडे वळण्याची शक्यता आहे. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी मराठीतून वेबिनार सत्र सुरू करणात येणार आहे.
- डॉ. विवेक बेल्हेकर, उपयोजित मानसशास्त्र व समुपदेशन विभाग, मुंबई विद्यापीठ
--
लॉकडाऊनमुळे घरात वैयक्तिक स्वातंत्रावर मर्यादा आल्याने कौटुंबिक कलह वाढले. कोरोनामुळे लोकांच्या मनात असुरक्षित वातावरण निर्माण केले. मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार असलेल्या लोकांसाठी तणाव घातक आहे. अनेकांच्या झोप येत नसल्याच्या तक्रारी आहे.
– डॉ. शुभांगी पालकर, मानसोपचार तज्ज्ञ
समुपदेशनासाठी लिंक
मुंबई विद्यापीठ - http://mu.ac.in/online-counseling-for-covid-19-english#1586164874101-fa7c5014-29dd
रयत शिक्षण संस्था , वाशी - https://bit.ly/3ekhvXi
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.