nandu joshi case dombivli woman strike in front of manpada police station bjp mumbai Sakal
मुंबई

Nandu Joshi Case : PM, CM, महिला आयोगाकडे न्यायासाठी साकडं; पोलीस ठाण्यासमोर महिलेचा ठिय्या!

चार दिवसांपासून पिडीत महिला मानपाडा पोलीस ठाण्याबाहेर उपोषणास बसत आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - भाजपचे डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. या मुद्द्यावरुन भाजपने मानपाडाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांची बदली करण्याची मागणी केली. बागडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटातील राजकीय वाद उफाळून आला.

या वादात मुळ मुद्दा बाजूला पडल्याने पिडीत महिलेने उपोषण सुरु केले आहे. चार दिवसांपासून पिडीत महिला मानपाडा पोलीस ठाण्याबाहेर उपोषणास बसत आहे. 'पंतप्रधान, उपमुख्यमंत्री आणि महिला आयोग मला न्याय देणार की नाही ? असा सवाल या महिलेने केला असून जोशी यांना अटक होत नाही तोपर्यंत माझे उपोषण सुरु असेल असे महिलेने पत्रकारांशी बोलताना सांगितले.

भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री नंदू जोशी यांच्यावर मानपाडा पोलिस ठाण्यात महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल आहे. यावरुन भाजपने मानपाडा पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून आंदोलन करत वरिष्ठ पोलिस निरिक्षक बागडे यांच्या बदलीची मागणी केली. बागडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले.

बागडे यांना प्रशासन पाठीशी घालत आहे. भाजप मधील जुन्या कार्यकर्त्यांवर असे खोटे गुन्हे दाखल करुन त्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचे काम सुरु आहे असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. याला राजकीय पाठबळ असल्याचे सांगत भाजपच्या बैठकीत कल्याण लोकसभा मतदार संघात शिंदे गटाला सहकार्य न करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

या मुद्द्यावरुन सध्या राजकारणात मोठ्या प्रमाणात खळबळ माजली आहे. या राजकीय वादात मुळ मुद्दा बाजूला पडत असून पिडीत महिलेवरील अत्याचाराकडे साऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने अखेर महिलेने उपोषणाची भूमिका घेतली. आहे. सदर पीडित महिला गेल्या तीन चार दिवसांपासून मानपाडा पोलिस ठाण्याच्या बाहेर उपोषणास बसली आहे.

पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, मी येथे चार दिवसापासून उपोषणाला बसली आहे. नंदू जोशी याला अटक करुन मला न्याय मिळावा अशी माझी अपेक्षा आहे. जोशी हे भाजप पूर्व मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी माझ्याकडे शरीर सुखाची मागणी केली होती.

माझ्या नवऱ्याचे ते मित्र असून त्यांची पार्टनरशिप मध्ये व्यवसाय सुरु आहेत. त्यातून त्यांचे घरी येणे जाणे असायचे. पोलिस निरिक्षक बागडे यांना परत आणावे आणि जोशी यांना अटक व्हावी ही माझी मागणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्य महिला आयोगाने माझी दखल घेत मला न्याय द्यावा. जोशी यांना अटक होत नाही तोपर्यंत उपोषण सुरु ठेवणार असल्याचे पीडित महिलेने सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Crash: निफ्टी आणखी 1,000 अंकांनी घसरू शकतो; शेअर बाजारात सातत्याने का कोसळत आहे?

आज नाही जन्मदिन नाही पुण्यतिथी तरीही गुगलने का बनवला सुप्रसिद्ध गायक केके यांचं डुडल ?

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीला सुरुवात

Firing On School Van: उत्तर प्रदेशात देशाला हादरवणारी घटना! स्कूल व्हॅनवर तरुणांकडून गोळीबार

Chh. Sambhajinagar Assembly Election 2024 : छत्रपती संभाजीनगर ‘वंचित’ मतांमध्येही आघाडी घेणार का?

SCROLL FOR NEXT