मुंबई

"संजय राऊत यांचं वक्तव्य उद्धव ठाकरेंना मान्य ?"

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - संजय राऊत यांनी काल केलेल्या इंदिरा गांधी आणि त्यांची अंडरवर्ल्ड डॉन करीमलाला सोबत झालेली भेट त्याचबरोबर उदयनराजे यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे मागितलेले पुरावे यावरून आता महाराष्ट्रात चांगलंच रान पेटलंय. संजय राऊत यांच्या या दोन्ही वक्तव्यांवरून महाराष्ट्रात रोष व्यक केला जातोय. अशात कालपासूनच मोठ्या प्रमाणावर राजकीय प्रतिक्रिया येताना पाहायला आणि ऐकायला मिळतायत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी इंदिरा गांधींच्या वक्तव्याचा निषेध करत, संजय राऊत यांनी माफी मागितल्यामुळे त्यावर आता चर्चा नको असं म्हटलंय. तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, आता काँग्रेस आणि त्यांच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनबद्दल खुलासा करावा, अशी  मागणी केलीये. चंद्रकांत पाटलांनी देखील उदयनराजे यांच्याविरोधातील विधानाचा निषेध करत संजय राऊत यांना खडेबोल सुनावलेत. अशात सध्याचे भाजपवासी नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर तोफ डागली आहे. 

संजय राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडलंय 

संजय राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडलंय आणि त्यांना सत्तेचा माज आलाय, त्यांची जीभ सैल सुटली आहे असं नारायण राणे म्हणालेत. यावेळी नारायण राणे यांनी संजय राऊत यांना, 'पुन्हा असं वक्तव्य केलं तर राऊत यांची जीभ जागेवर राहणार नाही' असा सज्जड दम भरलाय. संजय राऊत यांना मी पत्रकार मानत नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे महाराष्ट्राची ओळख आहे, त्यामुळे शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांच्याकडे कसलेही पुरावे मागू नयेत असं देखील नारायण राणे म्हणालेत. 

संजय राऊत यांचं वक्तव्य उद्धव ठाकरेंना मान्य ? 

संजय राऊत यांचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का ? असा सवाल देखील नारायण राणे यांनी उपस्थित केलाय. याला जोड देताना उद्धव ठाकरे यांनी याबाबत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अदयाप काहीही वक्तव्य केलेलं नाही. त्यामुळे त्याचा अर्थ काय काढायचा ? संजय राऊत यांचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का ? असा सवाल उपस्थित केलाय. दरम्यान उद्या जर राज्यात काही गंभीर परिणाम झाले तर त्याची जबाबदारी संजय राऊत आणि सरकारची असेल असंही म्हटलंय. 

मुंबईत पत्रकार परिषद घेत नारायण राणे यांनी आपलं मत व्यक्त केलंय. 

narayan rane on sanjay raut and his controversial statement on indira gandhi and udayan raje

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who Is Maharashtra CM: शिंदेंना मान्यता मिळणार की फडणवीस महाराष्ट्राची कमान सांभाळणार? मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण पुढे?

मंगळवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी! सोलापूर जिल्ह्यातील एका आमदाराला मिळणार कॅबिनेट मंत्रिपदाची संधी? विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुखांची नावे चर्चेत

Sakal Podcast: महायुतीचा महाविजय, मविआचा धुव्वा ते शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना!

Panchang 24 November: आजच्या दिवशी श्री सूर्यांय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

आजचे राशिभविष्य - 24 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT