आपण जेव्हा स्वातंत्र्याचे १०० वे वर्ष साजरे करू, तेव्हा आपला भारत देश जगातील विकसित राष्ट्रांमध्ये समाविष्ट झालेला असेल. विकसित राष्ट्र होण्याच्या या प्रवासात मोठ्या शहरांइतकीच लहान शहरांची भूमिकाही महत्त्वाची आहे. त्यामुळे लहान शहरांच्या सुयोग्य विकासासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
'विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील विविध ठिकाणी नागरिकांशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे आज संवाद साधला. त्यात मुंबईतील मालाड येथील शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशीही त्यांनी संवाद साधला.
मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये विशेष चार वाहनांद्वारे २८ नोव्हेंबर ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या 'पी उत्तर' या मालाड पश्चिम विभागातील बिल्ला बाँग शाळेजवळ स्थानिक नागरिकांना विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे माहिती आज देण्यात आली.
पालिकेच्या माध्यमातून विविध योजनांच्या लाभार्थी ठरलेल्या मेघना गुरव यांच्याशीही मोदींनी संवाद साधला. या वेळी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी उपस्थित होते.
मालाडमधील मेघना गुरव यांना मुद्रा योजना, पीएम स्वनिधी योजना, स्व समृद्धी योजना यांचा लाभ मिळाला आहे. गुरव यांनी शासकीय योजनांच्या लाभातून मिळालेल्या स्थैर्यानंतर कर्ज परतफेडही केली. त्यांच्या मुलाला शैक्षणिक कर्ज प्राप्त झाले. त्यामुळे तो परदेशात शिक्षणासाठी रवाना झाला आहे. गुरव यांनी याअनुषंगाने विविध शासकीय योजनांचा लाभ, त्यातून आयुष्याला मिळालेला आधार व स्थैर्याबाबत अनुभवकथन केले.
आपल्यासोबतच बचत गटातील २५ सहकारी महिलांनाही सजलर मिळाला असून, या माध्यमातून तयारी कहिल्यना चादरींना परदेशात मागणी असल्याचे सांगताच मोदी यांनी गुरव यांचे अभिनंदन केले. केंद्र सरकार दृढनिश्चयी नागरिकांच्या पाठीशी उभे राहून त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मेघना यांनी इतर महिलांनाही स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहित करावे. त्यांना शासकीय योजनांची माहिती द्यावी, अशी विनंतीही पंतप्रधान मोदी यांनी गुरव यांना केली.
विकसित संकल्प भारतयात्रा सुरू होऊन एक महिना झाला. या काळात हजारो गावांसह दीड हजार शहरांपर्यंत ही यात्रा पोहोचली आहे. तसेच कोट्यवधी नागरिक या यात्रेच्या माध्यमातून विविध योजनांचा फायदा घेत आहे. अनेक लाभार्थी 'नमो ॲप'वरही यात्रेबाबत, त्यांच्या उद्योग-व्यवसायाबाबत माहिती दिली. या माहितीमुळे इतर तरुण, लहान-लहान उद्योजक तसेच महिलांनाही रोजगार व्यवसायासाठी प्रोत्साहन मिळत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.