Nashik Loksabha bhujbal  
मुंबई

Nashik Loksabha: शिंदे यांच्या आग्रहामुळे भुजबळांनी केली तलवार म्यान

भाजपच्या ‘सोशल इंजिनिरिंग’साठी होता नाशिकचा आग्रह

सकाळ वृत्तसेवा

विजय चोरमारे/सकाळ न्यूज नेटवर्क

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून स्वतः होऊन माघारीची घोषणा केल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. माघारीच्या कारणांबाबत मतमतांतरे असली तरी स्वतः भुजबळ यांनी निवडणुकीच्या रिंगणातून सन्मानजनक सोडवणूक करून घेतली आहे. (Chhagan Bhujbal vs shivsena in nashik )

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या जागेचा आग्रह न सोडल्यामुळे भाजपच्या सोशल इंजिनिअरिंगसाठी होणारे भुजबळ यांनी तलवार म्यान केल्याचे मानले जाते.

भारतीय जनता पक्षाने प्रमोद महाजन-गोपीनाथ मुंडे यांच्या काळात आपला सामाजिक पाया विस्तारला. तो माळी-धनगर-वंजारी समाजाच्या मतांचा ‘माधव’ फॉर्म्युला पुनरुज्जीवित करण्याचे भाजपचे प्रयत्न होते. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी केलेल्या आंदोलनामुळे भाजपला मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.(eknath shinde maharashtra news)

त्याचदरम्यान भाजपने ओबीसी समाजघटकांचे संघटन सुरू केले. त्याचाच भाग म्हणून वंजारी समाजामध्ये मान्यता असलेल्या पंकजा मुंडे यांना बीडमधून आणि धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांना परभणीतून महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली. त्याचवेळी छगन भुजबळ यांना नाशिकमधून उमेदवारी देऊन माळी समाजाला या प्रक्रियेत सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू होते.(bjp with Chhagan Bhujbal)

नाशिकची जागा शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाची असून तेथे हेमंत गोडसे त्यांचे विद्यमान खासदार आहेत. लोकसभा निवडणुकीचे जागावाटप सुरू झाल्यानंतर भाजपने आपल्या कथित सर्वेक्षणांची भीती दाखवून शिवसेनेला आपले काही उमेदवार बदलण्यासाठी दबाव वाढवला. पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या दबावाखाली आले आणि रामटेकमधून कृपाल तुमाने यांना बदलण्यात आले.

कोल्हापूर, हातकणंगले, हिंगोली, यवतमाळ-वाशीम या जागांसंदर्भातही भाजपचा शिंदे गटाचे उमेदवार बदलण्याचा आग्रह होता. नाशिक मतदारसंघही त्याच यादीत होता. रामटेकनंतर हिंगोलीत जाहीर झालेली हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलण्यात आली. त्यामुळे शिंदे गटातील खासदार आणि आमदारांमधून तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली. आपले समर्थक आमदार आणि खासदारच बिथरल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही अस्वस्थ झाले आणि त्यांनी भाजपच्या दबावाला न जुमानण्याचे धोरण स्वीकारले.(eknath shinde maharshtra cm)

भाजपचा विरोध असतानाही हातकणंगलेमधून धैर्यशील माने आणि कोल्हापूरमधून संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर केली. हिंगोलीची उमेदवारी बदलली तरी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशीममधून उमेदवारी देण्यात आली. नाशिकसंदर्भातही शिंदे यांनी ठाम भूमिका घेतली.

भुजबळ यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध होताच, परंतु भाजपच्या स्थानिक नेत्यांचाही तीव्र विरोध होता. मोठा विरोध असताना आणि भुजबळ यांचा पराभव होऊ शकतो, याची कल्पना असतानाही भाजपचे केंद्रीय नेतृत्व भुजबळ यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते.(hemant godse shivsena shinde nashik mp)

अमित शहा हेच आग्रही असल्यामुळे भुजबळांना नकार देता येत नव्हता आणि शिवसेनेचा विरोध असल्यामुळे लढण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त करता येत नव्हती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून लढणा-या हेमंत गोडसे यांच्याकडून भुजबळ यांचा एक लाख ८७ हजार मतांनी पराभव झाला होता. २०१९ च्या निवडणुकीत भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांचा गोडसे यांनीच दोन लाख ९२ हजार मतांनी पराभव केला होता.(sameer bhujbal vs hemant patil 2019)

भुजबळ यांनीच जाहीर केली माघार

नाशिक मतदारसंघाची ही पूर्वपीठिका आणि अलीकडचे जातीय ध्रुवीकरण पाहता भुजबळ यांच्यासाठी कोणत्याही प्रकारे नाशिक मतदारसंघ सोयीचा नव्हता. असे असतानाही भाजपच्या सोशल इंजिनिअरिंगसाठी भुजबळ यांच्या उमेदवारीचा बळी देण्याची तयारी करण्यात येत होती.

भुजबळ यांची कोंडी झाली होती आणि एकनाथ शिंदे जागा सोडायला तयार नव्हते. भुजबळ यांनी स्वतः जाहीर केलेली माघार म्हणजे महायुतीमध्ये नाशिकची जागा शिवसेनेला मिळाल्याचेच मानले जाते. उमेदवारी आधी जाहीर झाली असते तर भुजबळ यांना डावलल्याचा संदेश गेला असता. ते टाळण्यासाठी आधी भुजबळ यांनी माघार जाहीर करून सन्माननीय सुटका करून घेतल्याचे मानले जाते.(bhujbal vs bjp in nashik)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT