सासरकडील मंडळीकडून चारित्र्याच्या संशयावरुन होत असलेल्या सततच्या मानसिक व शारीरीक छळाला कंटाळलेल्या शिरवणे गावातील एका विवाहितेने वाशीतील जुहूगावात राहणाऱया आपल्या आई वडिलांच्या घरात आत्महत्या केल्याची घटना गत आठवडÎात घडली होती.
या घटनेनंतर वाशी पोलिसांनी मृत विवाहितेचा पती, सासु व पतीचा मित्र या तिघा विरोधात छळवणुकीसह, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.
या घटनेतील मृत विवाहितेचे नाव भाविका प्रितम सुतार (28) असे असून वर्षभरापुर्वी तिचा विवाह शिरवणे गावातील प्रितम विठ्ठल सुतार (35) याच्यासोबत झाला होता. लग्नानंतरचे काही दिवस सुरळीत गेल्यानंतर प्रितम भाविकाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तीला शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली होती.
गत 2 जानेवारी रोजी रात्री भाविकाला तिचा पती प्रीतम सुताऱ त्याची आई आशा विठ्ठल सुतार आणि शेजारी आशुतोष संतोष पाटील व त्याच्या कुटुंबियांनी भाविकाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली होती. त्यावेळी भाविकाचे आई वडील त्यादिवशी रात्री व दुसऱया दिवशी नेरुळ पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले होते. मात्र, नेरुळ पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करुन घेतले नाही. तसेच त्यांचे काहीही ऐकून घेतले नसल्याचा आरोप मृत भाविकाचे वडिल बबन पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, सासरकडील मंडळीकडुन सतत छळ होत असल्याने भाविका त्यादिवशी आपल्या आई वडिलांच्या घरी जुहूगाव येथे आली होती. त्यानंतर भाविका मानसिक तणावाखाली आली होती. शुक्रवारी 5 जानेवारी रोजी दुपारी भाविकाचे आई वडिल उपचारासाठी बाहेर गेलेले असताना, घरामध्ये एकटीच असलेल्या भाविकाने पहिल्या मजल्यावरील बेडरुममधील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
दुपारी 3 च्या सुमारास भाविकाचे आई वडील घरी परतल्यानंतर भाविका गळफास घेतलेल्या स्थितीत आढळुन आली होती. वाशी पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करुन पुढील तपास केला असता, भाविकाच्या सासरकडील मंडळींनी तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ केल्यामुळे तीने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
त्यानुसार वाशी पोलिसांनी बुधवारी रात्री भाविकाचा पती प्रतिम सुतार, सासु आशा सुतार आणि शेजारी राहणारा प्रितमचा मित्र आशुतोष पाटील या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.