Firing 
मुंबई

एरोली: निवृत्त पोलिसाच्या गोळीबारात एका मुलाचा मृत्यू

विजयला तीन गोळ्या लागल्या होत्या.

दीनानाथ परब

नवी मुंबई: ऐरोलीतील एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने (Former cop shoots) काल आपल्याच दोन मुलांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याने दोन्ही मुलांना घरी बोलवून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात ३३ वर्षीय विजयचा मृत्यू झाला आहे, तर त्याचा लहान भाऊ सुजय (३१) जखमी झाला आहे. विजयला तीन गोळ्या लागल्या होत्या. दोन पोटात आणि एक दंडावर गोळी लागली होती. रात्री रुग्णालयात उपचार सुरु असताना विजयचा मृत्यू झाला. (navi mumbai airoli area Former cop shoots at sons one dead another injured)

भगवान पाटील (७४) असे आरोपीचे नाव आहे. ते निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे. रबाळे पोलिसांनी भगवान पाटील यांना अटक केली आहे. कार इन्शुरन्सचे पैसे भरण्याच्या वादातून भगवान पाटील यांनी आपल्या दोन मुलांवर गोळ्या झाडल्या. आयपीसी सेक्शनच्या हत्या आणि हत्येचा प्रयत्न या कलमांखाली भगवान पाटील यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

गोळीबार केला त्यावेळी भगवान पाटील नशेत असावेत असा पोलिसांना संशय आहे, पोलिसांनी त्यांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. ऐरोली सेक्टर ३ मध्ये संध्याकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना घडली. विजय वसईला राहतो. त्याला गाडीचा हप्ता भरण्यासाठी इन्शुरन्स कंपनीकडून फोन आला. त्याने वडिल भगवान पाटील यांना फोन केला. त्यावेळी दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली असे पोलिसांनी सांगितले.

पाटील यांनी दोन्ही मुलांना घरी बोलवून घेतले. मुले घरी पोहोचल्यानंतर पुन्हा वादावादी सुरु झाली. संतापाच्या भरात भगवान पाटील यांनी आपल्याच दोन मुलांवर गोळ्या झाडल्या. कौटुंबिक वादामुळे दोन्ही भाऊ स्वतंत्र राहत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT