crime news jail  sakal
मुंबई

Navi Mumbai: हिंदू नावाने बनावट कागदपत्र तयार करणारे बांग्लादेशी दाम्पत्य अटकेत

बनावट ओळखपत्रांचा भांडाफोड: बांग्लादेशी दाम्पत्याची अवैध वास्तव्यातून गजाआड

सकाळ वृत्तसेवा

Panvel Crime: बांग्लादेशी नागरीक असल्याची व मुस्लीम असल्याची ओळख लपविण्यासाठी एका बांग्लादेशी दाम्पत्याने आपले मुस्लीम नाव बदलुन हिंदू नावाचे बनावट भारतीय आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड, निवडणुक ओळखपत्र, बँक पासबुक बनवुन घेतल्याचा धक्कादायक प्रकार पनवेलमध्ये उघडकीस आला आहे.

दशतवाद विरोधी पथकाच्या नवी मुंबई युनिटने या दोघांची धरपकड केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे मागील चार वर्षापासून हे बांग्लादेशी दाम्पत्य आपली खरी ओळख लपवून पनवेल भागात बेकायदेशीरीत्या राहत असल्याचे उघडकीस आले आहे.

दशतवाद विरोधी पथकाने या दोघांनी तयार करुन घेतलेले भारतातील बनावट कागदपत्रे जफ्त करुन दोघांना अटक केली आहे.

पनवेल तालुक्यातील कोलवाडी भागातील पोपेटा बिल्डींगमध्ये एक बांग्लादेशी नागरीक बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाच्या नवी मुंबई युनिटला मिळाली होती.

या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा शेंडगे, पोलीस निरीक्षक तुकाराम नलावडे, पोलीस उपनिरीक्षक मिरा लाड, विजयकुमार पाटील व त्यांच्या पथकाने गत 15 फेब्रुवारी रोजी दुपारी पनवेल तालुक्यातील कोलवाडी मधील पोपेटा बिल्डींगमधील एका घरावर छापा मारला होता.

त्यानंतर पोलिसांनी सदर घरामध्ये राहत असलेल्या रंजन सत्यरंजन दास उर्फ अस्लम कुडुस शेख (35) याच्याकडे चौकशी केली असता, तो व त्याची पत्नी हुसना अस्लम शेख उर्फ मलिना रंजन दास (34) या दोघांनी 2015 मध्ये बांग्लादेशातील गरीबीस कंटाळुन घुसखोरीच्या मार्गाने भारत बांग्लादेश सीमेवरील गस्ती पथकाची नजर चुकवून भारतात प्रवेश केल्याचे सांगितले.

तसेच या दोघांनी बांग्लादेशी नागरीक असल्याची व भारतामध्ये काम मिळविण्यासाठी मुस्लीम असल्याची ओळख लपवून हिंदू नावाने बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड, भारतीय निवडणुक ओळखपत्र, बँकेचे पासबुक आदी कागदपत्रे बनवून घेतल्याची कबुली दिली.

त्यानंतर दशतवाद विरोधी पथकाने या दोघांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात बनावट कागदत्रे तयार करुन फसवणुक केल्याप्रकरणी तसेच विदेशी व्यक्ती अधिनियम, पारपत्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. या दोघांना बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणुक ओळखपत्र, रेशन कार्ड व बँक पासबुक बनवुन देणाऱयाचा पोलिसांकडुन शोध घेण्यात येत आहे.

या कारवाईत अटक करण्यात आलेला बांग्लादेशी नागरीक अस्लम कुडुस शेख हा 2016 मध्ये पनवेल परिसरात मजुरीचे काम करत असताना, त्याची ओळख पनवेलच्या कोलवाडी परिसरात घरकाम करुन राहणाऱया बांग्लादेशी महिला हुसना अस्लम शेख हिच्यासोबत झाली होती.

ती देखील भारतामध्ये अवैधरित्या प्रवेश करुन वास्तव्य करत असल्याचे समजल्यानंतर त्या दोघांनी 2016 मध्ये लग्न केले. त्यानंतर हे दोघे मजुरी व घरकाम करुन मागील 4 वर्षापासून राहत असल्याचे आढळुन आले आहे.

हे दाम्पत्य बांग्लादेशातील आपल्या आई वडिल व नातेवाईकांना संपर्क साधण्यासाठी इमो या ऍफ्लीकेशनचा तसेच व्हॉट्सऍप कॉलींगचा वापर करत असल्याचे तपासात आढळुन आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT