लोकसभा 2019
नवी मुंबई : लोकसभेच्या प्रचाराची रणधुमाळीला जोरात सुरू झाली आहे. सर्वच पक्षांनी कंबर कसली असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. दोनच दिवसांपुर्वी राज ठाकरेंच्या सभा म्हणजे टुरिंग टॉकीज असून काल सोलापूरमध्ये शो होता, तर आज कोल्हापूरमध्ये आहे, अशा शब्दात तावडे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला होता. मात्र मनसे विनोद तावडे यांची जास्तच काळजी घेताना दिसत आहे. मनसेचे शहर प्रमुख गजानान काळे यांनी विनोद तावडे यांच्यासाठी थेट गृहमंत्री राजनाथ सिंगाना पत्र लिहले आहे.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना किमान एकदा आपल्या गाडीत बसण्याची संधी देण्याबाबत हे पत्र लिहण्यात आले आहे. 'आपल्या सुरक्षारक्षकाने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना आपल्या गाडीत बसण्यास रोखल्यापासून, महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून, त्यांना त्वरित मानसोपचाराची गरज आहे. त्यात कहर म्हणजे आपल्या पक्षाने त्यांना राज्याचे गृहखाते सुद्धा न देता निव्वळ शिक्षण खात्यावर बोळवण केल्यामुळे ते दिवसेंदिवस भरसटत चाललेले आहेत.' असं या पत्रात म्हटले आहे.
तावडे राज ठाकरे यांच्यावर घसरल्या नंतर मनसैनिकांनी तावडे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपचा विधिमंडळ पक्षनेता निवडण्यासाठी 2014 मध्ये विधानभवन परिसरात मोठी लगबग सुरू असतानाच भाजपचे नेते विनोद तावडे यांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या बॉडीगार्डने धक्काबुक्की केली होती. तावडे राजनाथ यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांच्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करत असताना या बॉडीगार्डने त्यांना बखोटीला धरून खेचले होते. याचीच आठवण करून देत मनसैनिकांनी विनोद तावडे यांनी डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.