Omicron Corona variant sakal media
मुंबई

'ओमिक्रॉन व्हेरियंट'चा नवी मुंबईला धोका

तीन आठवड्यात परदेशातून आलेल्यांची माहिती मागवली

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : कोविड १९ (corona) या विषाणूत झालेल्या आमूलाग्र बदलानंतर ‘ओमिक्रोन व्हेरियंट’ (Omicron variant) नवी मुंबई शहरासाठी (Navi Mumbai city) डोकेदुखी ठरणार आहे. दक्षिण आफ्रिकेसह (South Africa) बोटस्वान, हॉंगकॉंग आणि युरोप या देशांत (Europe countries) ओमिक्रोन या नव्या व्हेरीयंटची लागण झालेले रुग्ण सापडले (New patients) आहेत.

नवी मुंबईत ऐरोली, वाशी आणि बेलापूर येथे असणारे कॉल सेंटर आणि एमआयडीसीतील काही कंपन्यांमध्ये या देशातून व्यवहार चालतात. त्या धर्तीवर धोका ओळखून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी गेल्‍या तीन आठवड्यात परदेशातून नवी मुंबईत आलेल्या नागरिकांची माहिती मागवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रोन या व्हेरीएन्ट बद्दल संपूर्ण जगभरातील देशांना सावधानतेचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकारने कोविड निर्बंधांमध्ये बदल केले आहेत.

तसेच राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांना खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्याला प्रतिसाद देत अभिजीत बांगर यांनी तातडीने सर्व विभाग प्रमुख, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत शहरातील कोविड रुग्ण आणि परिस्थितीचा आढावा घेत काही नवीन सूचना दिल्या. ओमिक्रोन व्हेरिएन्टचे रुग्ण ज्या देशांमध्ये सापडले आहेत. अशा देशांना हायरिस्क देश म्हणून घोषित केले आहेत. अशा देशातून येणाऱ्या व्यक्तींवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना बांगर यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत.

युरोप, साउथ आफ्रिका, हॉंगकॉंग, बोटस्वाना अशा देशातील येणाऱ्या नागरिकांची माहिती घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर टेस्ट केल्यानंतर निगेटिव्ह आलेल्या नागरिकांना घरी १४ दिवस विलगीकरण व्हावे लागणार आहे. अशा लोकांवर नजर ठेवण्याचे काम नागरी आरोग्य केंद्रांना करावे लागणार आहे. तसेच या लोकांची आठ दिवसांनी टेस्ट केली जाणार आहे. परंतु एक दिवसाआड टेस्ट करण्याचा विचारही राज्य सरकारतर्फे सुरु आहे. नवी मुंबईतील कॉल सेंटर, आयटी कंपन्यांमुळे हायरिस्क देशातून येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण जास्त असल्याने महापालिकेला अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे.

परदेशातील नागरिकांवर करडी नजर

ओमिक्रोन हा नवा व्हेरीएन्ट परदेशात काही महिन्यांआधीच आला आहे. याअर्थी आपल्या देशात या व्हेरीएन्टचा रुग्ण आला असल्यास तो गर्दीत मिसळण्याची शक्यता अधिक आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मागच्या तीन आठवड्यात परदेशातून नवी मुंबईत आलेल्या नागरिकांच्या नावाची यादी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासन आणि मुंबई महापालिकेकडून मागवल्या आहेत. त्यांना लक्षणे असल्यास त्यांच्या संपर्कातील लोकांची माहिती गोळा केली जाणार आहे.

सार्वजनिक कार्यालयांमध्ये मास्कचा विसर

शहरात कोविडचे रुग्ण संख्या घटल्यानंतर मास्क न वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मास्क न घालणाऱ्यांची पडताळणी करण्यासाठी महापालिकेने काही पथके सार्वजनिक कार्यालयांमध्ये पाठवली होती. तेव्हा विविध बँका, दुय्यम निबंधिक कार्यालये, महसुल कार्यालयांमध्ये येणारे नागरिक तोंडावर मास्क लावत नाही. पण संबंधित कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी सुद्धा तोंडावर मास्क लावत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

दंडात्मक कारवाई तीव्र होणार

कोविड-१९ च्या नवीन व्हेरिएन्टनंतर राज्य सरकारने खबरदारीचे आदेश दिले आहेत. त्या धर्तीवर शहरात पुन्हा मास्क न लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मोहीम तीव्र होणार आहे. मास्क न लावणाऱ्यांवर २०० रुपयांऐवजी ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. दुकानदाराला तब्बल दहा हजारांचा दंड असणार आहे. ही मास्क न लावणाऱ्यांवरील कारवाई करण्यासाठी महापालिकेने स्थानिक पोलिसांची मदत घ्यावी असे आदेश आल्याची माहिती आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingre: शरद पवार ईडीला घाबरले नाहीत, तुमच्या नोटिशीला काय घाबरणार! सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना टोला

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Vadgaon Sheri News : पोर्शे अपघात प्रकरणी टिंगरेंनी दिली शरद पवार यांना नोटीस - सुप्रिया सुळे

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SCROLL FOR NEXT