Navi Mumbai Crime: sakal
मुंबई

Navi Mumbai Crime: परदेशात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांची फसवणूक, 23 जणांकडून उकळले...!

सकाळ वृत्तसेवा

Crime News: अजारबैजान या देशामध्ये नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून एका टोळीने 23 बेरोजगार व्यक्तींकडून सुमारे 17 लाख रुपये उकळून त्यांना बनावट व्हिजा व विमानाची बनावट तिकीटे देऊन त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदर बेरोजगार व्यक्ती विमानतळावर गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.(navi Mumbai )

वाशी पोलिसांनी या टोळीतील शिरीन नामक महिला व तिच्या साथीदाराविरोधात फसवणूकीसह अपहार तसेच बनावटगीरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे. (panvel)

या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या टोळीने काही महिन्यांपुर्वी वाशी सेक्टर-17 मधील वाशी प्लाझा या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर हायर वर्ल्ड या नावाने कार्यालय थाटले होते. त्यांनतर या टोळीने सोशल मिडीयावर अजरबैजान देशामध्ये चालक म्हणुन नोकरीची संधी उपलब्ध असल्याची जाहिरातबाजी केली होती.

त्यामुळे मुंबईसह विविध भागातील अनेक बेरोजगार व्यक्तींनी वाशीतील हायर वर्ल्डच्या कार्यालयात शिरीन हिची भेट घेतली होती. त्यावेळी शिरीन हिने परदेशातील नोकरीसाठी येणाऱया बेरोजगारांना 15 हजार अमान प्रती महिना पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.

त्यानंतर शिरीन हिने संबंधितांकडून पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, फोटो व इतर कागदपत्रे तसेच अजरबैजान येथे जाण्यासाठी व्हिजा व विमानाच्या तिकीटासाठी प्रत्येकाकडुन 65 हजार ते 70 हजार रुपये घेतले. नाशिक येथील तीन तरुणांनी देखील या टोळीच्या अमिषाला बळी पडुन गत एप्रिल महिन्यामध्ये प्रत्येकी 70 हजार रुपये पासपोर्ट व इतर कागदपत्रे दिली होती.

त्यानंतर सदर टोळीने या बेरोजगारांना बनावट व्हिजा व अजरबैजान येथे जाण्याचे बनावट विमानाचे तिकीट व इतर कागदपत्रे त्यांच्याकडे दिली. तसेच त्यांचे 2 मे रोजी पहाटे 3 वाजता मुंबई विमानतळावर अजरबैजान साठी जजीरा एअरलाईन्सचे विमान असल्याचे सांगून आपले कार्यालय बंद करुन पलायन केले.

त्यामुळे नाशिक येथील तिघे तरुण मध्यरात्री मुंबई विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांच्याकडे असलेले व्हिजा व विमानाचे तिकीट बनावट असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर सदर तरुणांनी सकाळी वाशी येथे हायर वर्ल्डच्या कार्यालयात धाव घेतली असता, सदरचे कार्यालय बंद असल्याचे तसेच त्यांच्या प्रमाणेच फसवणुक झालेले अनेक बेरोजगार त्याठिकाणी आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यानंतर फसवणूक झालेल्या 23 व्यक्तींनी वाशी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या टोळीच्या हातून फसवणूक झालेल्या 23 बेरोजगार व्यक्तींनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असली तरी या टोळीने यापेक्षा अधिक लोकांची फसवणूक केली असल्याची माहिती फसवणुक झालेल्या तरुणांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: मनसे नेते अमित ठाकरे यांनी बजावला मतदानाचा हक्क

Nashik Vidhan Sabha Election 2024 : माझे वोट, माझी ताकद! पोलिस आयुक्तांचे मतदानाचे आवाहन

Ajit Pawar : विनोद तावडे प्रकरणामुळे महायुतीला बसणार फटका? वाचा काय म्हणाले अजित पवार

Sindhudurg Assembly Election 2024 : मतदानासाठी ओळखपत्र सोबत नेणे बंधनकारक

अर्ध्यावरती डाव मोडला! २९ वर्षांनी एन आर रहमान व सायरा बानू यांचा घटस्फोट, निवेदन जाहीर करत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT