Navi Mumbai Crime sakal
मुंबई

Navi Mumbai Crime: दोन हजाराच्या नोटा बदलून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरीकाला लुबाडले

सकाळ वृत्तसेवा

Navi Mumbai Crime: दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्याच्या बहाण्याने एका जोडफ्याने 70 वर्षीय ज्येष्ठ नागरीकाजवळच्या 1 लाख 60 हजार रुपये किंमतीच्या 80 नोटा घेऊन पलायन केल्याची घटना सीबीडी बेलापूर येथील रिझर्व्ह बँकेजवळ घडली.

चंद्रकांत प्रकाश सैंदाणे असे या जोडफ्यातील भामटÎाचे नाव असून सीबीडी पोलिसांनी सैंदाणे व त्याच्यासोबत असलेल्या तरुणीविरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.

या प्रकरणात फसवणुक झालेल्या ज्येष्ठ नागरीकाचे नाव गोकुळ गुफ्ता (70) असे असून ते मुंबईत वडाळा येथे राहण्यास आहेत. गत शनिवारी गुफ्ता हे त्यांच्याजवळ असलेल्या 2 हजार रुपये किंमतीच्या 80 नोटा बदलून घेण्यासाठी सीबीडी बेलापूर येथील रिझर्व्ह बँकेत गेले होते.

यावेळी नोटा बदलून घेण्यासाठी खुप मोठी रांग असल्याचे पाहून भामटÎा चंद्रकांत प्रकाश सैंदाणे याने गुप्ता यांच्याकडे जाऊन त्यांच्याजवळ असलेल्या 2 हजाराच्या नोटा बदलून देण्याबाबत चर्चा केली. तसेच एक नोट बदलून घेण्यासाठी 70 रुपये प्रमाणे 80 नोटांचे 5600 रुपये द्यावे लागतील असे सांगितले. काही वेळानंतर सैंदाणे हा एका तरुणीसोबत गुफ्ता यांच्याकडे गेला.

त्यानंतर त्याने नोटा बदली करण्यासाठी आणखी चार व्यक्ती त्याच्याकडे असल्याचे सांगून एका तासात नोटा बदली करुन आणुन देण्याचे आश्वासन त्यांना दिले. त्यानंतर त्याने आपले आधारकार्ड, पॅनकार्डची झेरॉक्स तसेच स्वत:चा व सोबत असलेल्या तरुणीचा मोबाईल नंबर देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे गुफ्ता यांनी आपल्या जवळच्या 80 नोटा त्याला बदलण्यासाठी दिल्या. त्यानंतर ते त्याच ठिकाणी सैंदाणे याची वाट पाहत बसले.

सायंकाळी 4 वाजता बँक बंद झाल्यानंतर देखील सैंदाणे हा पैसे घेऊन न परतल्याने गुफ्ता यांनी सैंदाणे व त्याच्या सोबतच्या तरुणीच्या मोबाईल फोनवर संपर्क साधला. मात्र दोघांचे फोन बंद असल्याचे आढळुन आले.

त्यामुळे गुफ्ता यांनी यांनी रात्री सैंदाणे याला संपर्क साधल्यानंतर त्याला पोलिसांनी पकडुन नेल्याचे व सर्व पैसे पोलिसांनी घेतल्याचा बहाणा केला. त्यामुळे दुसऱया दिवशी गुफ्ता पुन्हा रिझर्व्ह बँकेत गेले असता, त्याठिकाणी भेटलेल्या सैंदाणे याने रात्री पोलिसांनी गाडीमधुन कुठे नेले हे आठवत नसल्याचे सांगून त्या ठिकाणावर पलायन केले. त्यानंतर गुफ्ता यांनी सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT