Fraud sakal
मुंबई

Crime News: कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने सायबर टोळीने उकळले 3 लाख 92 हजाराची रक्कम

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Crime: कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने एका सायबर टोळीने कामोठे राहणाऱया एका व्यक्तीला वेगवेगळ्या कारणासाठी पैसे पाठविण्यास भाग पाडून त्याच्याकडुन 3 लाख 92 हजार उकळून त्याची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

कामोठे पोलिसांनी या प्रकरणातील सायबर टोळीविरोधात फसवणुकीसह आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.

या प्रकणात फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव सचिन खंदारे (41) असे असून ते कामोठे येथे राहण्यास आहेत. सचिन यांना वैयक्तीक कर्जाची आवश्यकता असल्याने त्यांनी गत महिन्यामध्ये जस्ट डायलवरुन बँकेची माहिती मागवली होती.

त्यानंतर सायबर टोळीतील रिना नामक महिलेने इंडिया बुल फायनान्समध्ये काम करत असल्याचे भासवून सचिनला संपर्क साधुन त्याच्याकडुन आधार व पॅनकार्ड बँकेचे स्टेटमेंट मागुन घेतले. त्यानंतर सायबर टोळीने दुसऱयाच दिवशी कर्ज मंजुर झाल्याचे पत्र सचिनला व्हॉट्सऍपवर पाठवून दिले. तसेच गुगल पेचा स्कॅनर पाठवुन त्यावर प्रोसेसिंग फिची 4500 रुपये भरण्यास सांगितले.

सदर रक्कम भरल्यानंतर तिसऱया दिवशी स्नेहा नावाच्या महिलेने सचिनला संपर्क साधुन ईसिएस चार्जेसची 17,250 रुपये तसेच जीएसटीची 33300 रुपये भरण्यास सांगितले. सदर रक्कम भरल्यांनतर श्रेया नावाच्या महिलेने संपर्क साधुन 45 हजार रुपये पाठवण्यास सांगितले.

मात्र सचिनला त्यांच्यावर संशय आल्याने त्यांनी इंडीया बुलचे कर्ज रद्द करण्यास सांगितले असता, श्रेयाने त्यांना कर्ज रद्द करण्यासाठी आणखी 27 हजार रुपये भरावे लागतील असे सांगितल्याने सचिनने 27 हजाराची रक्कम पाठवून दिली. त्यानंतर अर्चना कामत नावाच्या महिलेने इंडिया बुलची रिजनल मॅनेजर असल्याचे भासवून सचिनला संपर्क साधला. तसेच इंडीया बुलचे कर्ज रद्द न करण्याबाबत सांगितले. त्यामुळे सचिनने इन्शुरन्ससाठी 18 हजार रुपये पाठवून दिले.

त्यानंतर या टोळीने सचिनच्या खात्यावर 1 हजार रुपये पाठवून दिल्यानंतर आरबीएल बँकेचे मॅनेजर असल्याचे भासवून सदर टोळीतील सदस्याने सचिनला संपर्क साधुन त्याला मिळणाऱया कर्जाचे सिक्युरीटी चार्जेस म्हणुन 30,600 रुपये पाठवण्यास सांगितले.

अशा पद्धतीने या टोळीने सचिनला वेगवेगळी कारणे सांगून त्याच्याकडून 3 लाख 92 हजाराची रक्कम उकळली. मात्र त्यानंतर देखील या टोळीकडुन आणखी पैशांची मागणी करण्यात येऊ लागल्यानंतर आपली फसवणुक होत असल्याचे सचिनच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने सदर टोळीला पैसे पाठविणे बंद करुन कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Mumbai Crime:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT