Panvel News: तळोजा पोलिसांनी रविवारी पहाटे तळोजा सेक्टर-10 मधील एका फ्लॅटवर छापा मारुन महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला सुमारे तीन लाख रुपये किमतीचा गुटखा व इतर तंबाखुजन्य पदार्थाचा साठा जप्त केला आहे.
या कारवाईत पोलिसांनी कारमध्ये ठेवलेला गुटख्याचा साठा व कार जफ्त करुन दोघांना अटक केली आहे. तसेच त्यांनी सदरचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ कुठून आणला याबाबत तपास सुरु केला आहे. (taloja Crime)
तळोजा फेज-1 परिसरातील एका इमारतीच्या आवारात उभ्या असलेल्या कारमध्ये तसेच कारच्या मालकाकडे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधीत पान मसाला व सुगंधीत तंबाखुचा साठा विक्रीसाठी साठवणुक करुन ठेवण्यात आल्याची माहिती परिमंडळ-2 चे पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे यांना मिळाली होती.
त्यामुळे त्यांनी आपल्या अधिपत्याखालील पथकाला सदर ठिकाणी खात्री करुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पवार यांनी तळोजा पोलिसांच्या मदतीने रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास तळोजा सेक्टर-10 मधील मिडलँड सोसायटी या इमारतीत धाव घेतली. यावेळी सदर इमारतीच्या आवारात उभ्या असलेल्या मारुती सुझुकी एसएक्स-4 या कारची तपासणी केली असता, त्या गुटख्याच्या गोण्या ठेवल्याचे आढळुन आले.
त्यानंतर पोलिसांनी कार मालकाच्या घरावर छापा मारला असता, सदर फ्लॅटमध्ये मो.हमजा शाहीद खान (27) व अल्ताफ कासिम खान (22) हे दोघे राहत असल्याचे व त्यांनी सदर फ्लॅटमध्ये नायलॉनच्या गोण्यांमध्ये मोठया प्रमाणात गुटख्याचा साठा ठेवल्याचे आढळुन आले.
पोलिसांनी सदर गुटख्याचा साठा जफ्त करुन मो.हमजा खान याला त्याच्या कारजवळ नेऊन त्याची तपासणी केली असता, कारमध्ये देखील त्यांनी गोण्यांमध्ये गुटख्याचा साठा लपवून ठेवल्याचे आढळून आले.
त्यानंतर पोलिसांनी कारसह त्यात सापडलेला प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधीत तंबाखुचा साठा जप्त केला. त्यानंतर पोलिसांनी मो.हमजा खान व अल्ताफ खान या दोघांविरोधात अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियमानुसार गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.