Meeting at Union Ministry of Civil Aviation sakal
मुंबई

Navi Mumbai News : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव; केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयात बैठक संपन्न

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्रांची लढाई अखेर निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्रांची लढाई अखेर निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. दिल्ली मधील केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयात येथे महायुती सरकारच्या शिष्टमंडळाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार सोमवारी पडली.

त्या बैठकीत विमानतळाच्या नामांतराबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. याविषयीचा अंतिम ठराव पंतप्रधान कार्यालयात व कॅबिनेटमध्ये होऊन याची सकारात्मक घोषणा करण्यात येईल अशी माहिती मंत्री मंडळाकडून देण्यात आली आहे.

स्वर्गीय दि. बा. पाटील यांनी भूमिपुत्रांसाठी केलेल्या संघर्षाची जाणीव पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला पाठवला आहे.

त्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजूरी मिळावी यासाठी केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासमवेत दिल्ली मधील केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयात येथे महायुती सरकारच्या शिष्टमंडळाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार सोमवारी पडली. त्या बैठकीत विमानतळाच्या नामांतराबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विधानसभेचं सभागृह दणाणून सोडणारे, भूमिपुत्रांच्या न्यायासाठी आंदोलनाची हाक देणारे, प्रकल्पग्रस्तांसाठी साडेबारा टक्क्यांचा विकसित भूखंडाचा मोबदला ही योजना मांडणारे, या योजनेद्वारे नवी मुंबई आणि रायगड मध्ये भूमिपुत्रांचे अस्तित्व टिकवून ठेवणारे, भूमिपुत्रांचे दैवत म्हणजे दि बा पाटील होते असे ही चव्हाण म्हणाले.

मोदी सरकार हे देशातील भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या नेत्यांचा सन्मान करणारे सरकार असून केंद्र सरकार त्या प्रस्तावाला नक्कीच मंजूरी देईल, असा विश्वास शिष्टमंडळाने व्यक्त केला.

महाराष्ट्र शासनाने दोन्ही सभागृहात ठराव मंजूर केला असून, विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सदर बैठकीत मंत्री यांनी स्पष्ट केले की, लोकनेते दि. बा. पाटील साहेबांच्या नावाव्यतिरिक्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी इतर कुठलाही नावाचा प्रस्ताव आलेला नाही. हा प्रस्ताव आता अंतिम टप्प्यात आला असल्याने भूमिपुत्रांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या बैठकीत माजी मंत्री कपिल पाटील, जगन्नाथ पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, खासदार धैर्यशील पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, माजी खासदार संजीव नाईक, मनसे आमदार राजू पाटील, शेकापचे नेते जे. एम. म्हात्रे, संतोष केणे यांसह ठाणे, रायगड आणि नवीमुंबईतील नेत्यांचा समावेश या शिष्टमंडळात होता.

या बैठकीत मला सहभागी होण्याचा आनंद झाला आणि हा निर्णय भूमिपुत्रांच्या स्वाभिमानाचा विजय ठरणार आहे, याचा अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार राजू पाटील यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Candidate List: शिवसेनेची पहिली यादी जाहीर, दिग्गज नेते रिंगणात; कोणाला कोठून संधी?

Ramesh Wanjale: मनसेनं ठेवली आठवण! रमेश वांजळेंचे पुत्र मयुरेश वांजळेंना खडकवासल्यातून उमेदवारी जाहीर

Pune Crime : मालकाने पाळीव कुत्र्याला लटकावले फासावर; पर्वतीमध्येही श्वानावर गोळी झाडल्याचा प्रकार उघडकीस

MNS Vidhan Sabha Candidate List: दुसरे ठाकरेही निवडणुकीच्या रिंगणात! मनसेची ४५ उमेदवारांची यादी जाहीर; वरळीतून संदीप देशपांडे

महिला आयोगातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची कंत्राटे रद्द; ऐन दिवाळीत क्रूर निर्णय घेतल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT