Navi Mumbai International Airport trial landing 
मुंबई

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावर लवकरच होणार पहिले ट्रायल लँडिंग, मोदींच्या हस्ते उद्घाटन? जाणून घ्या वैशिष्ट्ये

Navi Mumbai International Airport trial landing : नवी मुंबई विमानतळाबद्दल एक आनंदाची बातमी समोर आली आहे. खूप दिवसांपासून प्रतिक्षेत असलेले नवी मुंबई विमानतळ येत्या ५ ऑक्टोबर रोजी पहिली ट्रायल लँडिंग नियोजित करण्यात आली आहे

रोहित कणसे

नवी मुंबई विमानतळाबद्दल एक आनंदाची बातमी समोर आली आहे. खूप दिवसांपासून प्रतिक्षेत असलेले नवी मुंबई विमानतळ येत्या ५ ऑक्टोबर रोजी पहिली ट्रायल लँडिंग नियोजित करण्यात आली आहे. हा विमानतळ येत्या जूनमध्ये आपल्या पूर्ण क्षमतेने सुरू होणे अपेक्षित आहे. हे विमानतळ मुंबई महानगराचा विकास आणि देशातील विमान सेवा उद्योग यासाठी महत्वाचा टप्पा असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ५ ऑक्टोबर २०२४ रोजी या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिली ट्रायल लँडिंग होणार आहे. या विमानतळामुळे मुंबई परिसरातील प्रवाशी संख्या हताळण्याची क्षमता ही ४० टक्क्यांनी वाढणार आहे. १९९९ साली प्रस्तावीतअसलेल्या या प्रोजेक्टचे काम २०१७ मध्ये सुरू करण्यात आले होते. अखेर हे विमानतळ पूर्ण झाले असून येत्या काही महिन्यात हे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे.

शहर व औद्योगिक विकास महामंडळाचे (सिडको) नवनियुक्त अध्यक्ष संजय शिरसाट यांनी नुकतीच विमानतळाच्या जागेला भेट दिली. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या माध्यमातून या बांधकामावर देखरेख करणाऱ्या अदानी समूहाचे अधिकारी देखील त्यांच्यासोबत होते.

ऑगस्ट महिन्यात एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने येथे इंस्ट्रूमेंटल लँडिग सिस्टिम(आयएलएस) ची यशस्वी चाचणी घेतली होती. ही चाचणी फ्लाइट पाथ आणि विमानतळाची कार्यक्षमता यांच्या निश्चितीसाठी महत्वाची असते.

तब्बल १,१६० एकरमध्ये पसरलेले हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी अपेक्षित खर्च जवळपास १६,७०० कोटी रुपये इतका आहे. या विमानतळावर दोन रनवे तयार करण्यात आले आहेत. ज्यांची लांबी १.५५ किलोमीटर इतकी आहे.

शिरसाट यांनी विमानतळाला दिलेल्या भेटीदरम्यान पहिल्या रनवेबद्दल माहिती दिली की मार्च २०२५ पर्यंत या विमानतळावरून देशांतर्गत उड्डाणे सुरू होणे अपक्षीत आहे. राज्य सरकार यासाठी वेगाने काम करत असून आंतरराष्ट्रीय विमानसेवा जून २०२५ सुरू करण्याचे नियोजन आहे.

या विमानतळावरून मार्च २०२५ पर्यंत देशांतर्गत उड्डाणे सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. तर ही देशांतर्गत उड्डाणे यशस्वीपणे सुरू केल्यानंतर, अदानी समूह आणि सिडकोने जून २०२५ पर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याची योजना आखली आहे. विमातळाच्या क्षमतेविषयी बोलायच झाल्यास एकावेळी ३५० विमाने पार्क करण्याची क्षमता विमानतळात असेल. तसेच येथे चार एकमेकांना जोडलेले टर्मिनल देखील असतील. या विमानतळाचा थेट परिणाम हा मुंबई महानगराच्या विकासावर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT