NAVI MUMBAI METRO  SAKAL
मुंबई

Navi Mumbai: मेट्रोने प्रवास करताय? मग, आधी जाणून घ्या काय आहेत तिकिटाचे दर

सकाळ डिजिटल टीम

Navi Mumbai Metro Ticket Rate: साडेबारा वर्षांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या नवी मुंबई मेट्रोतून गारेगार प्रवास आज नागरिकांनी अनुभवला. बेलापूर आणि पेंधर या दोन्ही रेल्वे स्थानकातून शुक्रवारी (ता. १७) दुपारी तीन वाजता नवी मुंबईकरांच्या पहिल्या टप्प्यातील मेट्रोने धाव घेतली.

सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे व राजेश पाटील, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर, पालिकेचे शहर अभियंता संजय देसाई, सहशहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्यासह सिडको आणि मेट्रो प्रकल्प कंपनीचे अधिकारी, नवी मुंबई, उरण, पनवेल परिसरातील नागरिक यांच्या उपस्थितीत नवी मुंबई मेट्रोचा शुभारंभ करण्यात आला.

गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांचे हित लक्षात घेऊन होणारी अडचण टाळण्यासाठी औपचारिकरीत्या लोकार्पण सोहळा न करता नवी मुंबई मेट्रो सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शुक्रवारी सिडको प्रशासनाने मेट्रोचा शुभारंभ केला. सिडको महामंडळाच्या वतीने नवी मुंबईमधील सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून नवी मुंबई मेट्रो प्रकल्प साकारण्यात आला असून या प्रकल्पांतर्गत एकूण चार उन्नत मार्ग विकसित करण्यात येत आहेत.

सिडकोमार्फत प्रथम बेलापूर ते पेंधर या ११.१० कि.मी. लांबीच्या मार्ग क्रमांक १ चा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. या मार्गावर ११ स्थानकांसह तळोजा पांचनंद येथे आगार (डेपो) आहे. बेलापूर रेल्वे स्थानकांतून दुपारी तीन वाजता मेट्रोची पहिली फेरी निघाली. या वेळी प्रवाशांनी टाळ्या तसेच घोषणा देत रेल्वेच्या प्रवासाला सुरुवात केली. मेट्रो सुरू होण्याच्या अगोदरपासून प्रवाशांनी स्थानकात हजेरी लावली होती.

मेट्रोचे दर

बेलापूर ते पेंधर या मार्गावर धावणाऱ्या मेट्रोच्या तिकिटाचे दर हे अंतरानुसार पुढीलप्रमाणे असणार आहेत.

० ते २ कि.मी.साठी १० रुपये

२ ते ४ कि.मी.साठी १५ रुपये

४ ते ६ कि.मी.साठी २० रुपये

६ ते ८ कि.मी.साठी २५ रुपये

८ ते १० कि.मी.साठी ३० रुपये

१० कि.मी. पुढील अंतराकरिता ४० रुपये

पहिल्या प्रवासासाठी गर्दी आणि सेल्फीचा मोह

गुरुवारपासून मेट्रो सुरू होणार असल्याचे मेसेज समाजमाध्यमावर झळकल्याने बेलापूर रेल्वे स्थानकात प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. मेट्रोच्या पहिल्या प्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक जण उपस्थित होते. शुभारंभानंतर सिडको कर्मचारी, अधिकारी, मेट्रो प्रकल्पातील अधिकारी, सुरक्षारक्षक, नवी मुंबई पोलिस, रेल्वे सुरक्षा दलाचा फौजफाटा शुभारंभाप्रसंगी उपस्थित होता. मेट्रोचे तिकीट काढण्यासाठी प्रवाशांनी रांग लावली होती.

प्रवाशांकडूनदेखील या वेळी व्हिडीओ तसेच मेट्रोबरोबर सेल्फी काढण्याचा मोह आवरता येत नव्हता. दुपारी तीन वाजता मेट्रो सुरू होणार असली, तरी प्रवाशांनी दुपारी दोन ते अडीच वाजल्यापासून रेल्वे स्थानकांच्या परिसरात गर्दी केली होती. महिलांसाठीदेखील आसनव्यवस्था आरक्षित ठेवण्यात आल्यामुळे महिला प्रवाशांकडून आनंद व्यक्त केला जात होता.

मागील अनेक वर्षांपासूनचे नवी मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण झाले आहे, याचा अधिक आनंद आहे. सकाळ ते संध्याकाळपर्यंत मेट्रो नवी मुंबईकरांसाठी धावणार आहे. सिडको प्रशासनाला केंद्र व राज्य सरकारने वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळेच मेट्रोचा टप्पा पार केला आहे. त्याबद्दल सरकारचे सिडकोतर्फे आभार मानतो.

- कैलास शिंदे, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको

आजचा क्षण हा सर्वांच्या आनंदाचा आहे. नवी मुंबई शहराच्या दृष्टीने मेट्रो सेवा म्हणजे मानाचा तुरा आहे. शहराच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या सिडकोने मेट्रो सुरू करून नागरिकांना दिलासा दिला आहे.

- राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

मेट्रोवर तीन महिला मोटरमन

नवी मुंबईत मेट्रो चालवण्यासाठी अंकिता नाईक, अदिती पडियार, अनुषा सांगावे या तीन महिला मोटरमनची नियुक्ती करण्यात आली आहे. या तिघीही अभियांत्रिकी पदवीधर आहे. त्यांना केवळ मेट्रो चालवण्याचेच शिक्षण दिले नसून आणीबाणीची परिस्थिती उद्भवली, तर त्यातून मार्ग काढण्यासाठीही सज्ज केले आहे. दहशतवादी हल्ला, वैद्यकीय आणीबाणीत काय करायचे, याचेही ज्ञान त्यांना देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT