Navi Mumbai mahapalika tax sakal
मुंबई

Navi Mumbai: पालिकेच्‍या तिजोरीत अडीज कोटीहून अधिक मालमत्ता कर जमा

आर्थिक वर्षातील उत्तम प्रतिसाद; महापालिकेच्या तिजोरीत विक्रमी मालमत्ता कर संकलन

Chinmay Jagtap

Navi Mumbai : महापालिकेच्या तिजोरीत चालू आर्थिक वर्षामध्ये एप्रिल महिन्यापासून ते फेब्रुवारीपर्यंत २५० कोटीहून अधिक मालमत्ता कर जमा झाला आहे. महापालिकेत आजवर दहा महिन्यामध्ये पहिल्यांदाच एवढा मालमत्ता कर जमा झाला आहे.

आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांनी मालमत्ता कर भरावा यासाठी विविध मोहिमांचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांचा या मोहिमेस उत्तम प्रतिसाद मिळत आहे. याचाच सकारात्मक परिणाम दिसून येत असल्‍याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी महापालिकेच्या तिजोरीत २५० कोटीहून अधिक रूपयांची भर पडली आहे. मालमत्ता कराच्या दरामध्ये दरमहा दोन टक्क्यांची वाढ होत आहे. त्‍यामुळे मालमत्ता कर वेळेत भरल्यास त्यांचा आर्थिक फायदा नागरिकांना होणार आहे. त्‍यामुळे अनेक नागरिकांनी मालमत्ता कर वेळेत भरला आहे.

तसेच ज्‍या नागरिकांना अजूनही मालमत्ता कराची बिले मिळाली नाही, त्यांनी महापालिकेच्या १८००५३२०३४० या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधल्यास कॉल सेंटरच्या माध्यामातून बिल घेता येणार असल्‍याचे पालिकेकडून सांगण्यात आले. तसेच मालमत्ता करासंदर्भातील हरकती जसे की नावामध्ये बदल, मालमत्तेच्‍या बाह्य स्वरूपाच्या मोजमापामध्ये काही त्रुटी राहणे, वापरामधील तफावत, स्वमालकी असताना भाडेतत्वावर कर आकारणी झाली असल्यास मालमत्ता धारकांनी हरकती अर्ज संबधित प्रभाग कार्यालयाकडे सादर करावेत, अशा सूचना पालिकेकडून करण्यात येत आहेत.

विशेष म्‍हणजे नागरिक देखील सूचनांचे पालन करत असल्‍याचे पोलिकेकडून सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मालमत्ताधारकांना नावामध्ये बदल करायचा असल्यास महापालिकेच्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून ते आता करता येणार आहे.

तसेच www. panvelmc.org या वेबसाईटवरती जाऊनही आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे. या सुविधांचा लाभ घेऊन नागरिकांनी मालमत्ता कर लवकरात लवकर भरावा तसेच मालमत्ताकराबाबत काही शंका असल्यास त्यांनी पालिकेच्‍या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधावा, असे आवाहन उपायुक्त गणेश शेटे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FIDE World Championship: भारताच्या डी गुकेशचं पराभवानंतर दुसऱ्या फेरीत कमबॅक, लढत ड्रॉ राखण्यात यश

Manoj Jarange Patil: ''एकदा सरकार स्थापन होऊ द्या.. तुम्ही तयारीला लागा'' मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Islamic Country: 'या' मुस्लिम देशात भारतीय लोक खरेदी करत आहेत मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी; जाणून घ्या कारण

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

SCROLL FOR NEXT