नवी मुंबई : अनेक संकटांवर मात करीत अखेर नवी मुंबई महापालिकेने (Navi Mumbai Municipal) १८ वर्षांवरील १०० टक्के नागरिकांना कोविड प्रतिबंधक लशीचा (people vaccination) पहिला डोस (First Dose) देण्यात यश मिळवले आहे. कमी वेळेत जास्तीत जास्त लाभार्थींना लशीचा पहिला डोस देणारी नवी मुंबई महापालिका एमएमआर क्षेत्रात (MMR Region) पहिली; तर राज्यात दुसरी ठरली आहे. नवी मुंबईपूर्वी पुणे महापालिका (pune Municipal) ११ ऑक्टोबरच्या आधी १०० टक्के नागरिकांना पहिला डोस देण्यात यशस्वी ठरली आहे.
नवी मुंबईत मार्च २०२१ पासून कोविड लसीकरणाला सुरुवात झाली. तेव्हा तब्बल ११ लाख सात हजार २३३ नागरिक पहिल्या डोससाठी पात्र ठरले. त्यानुसार पालिकेने लसीकरण सत्रांना प्रारंभ केला. सुरुवातीला दोन महिने मुबलक प्रमाणात लसपुरवठा झाला. नंतर तिसऱ्या महिन्याच्या दरम्यान लशीचा पुरवठा थांबला. अशा परिस्थितीतही महापालिकेने लसीकरण थांबवले नाही.
४५ वर्षांवरील आणि सहव्याधी असलेल्यांसाठी येत असणाऱ्या लशींमधून लसीकरण सुरूच ठेवले. त्यानुसार पालिकेने काही सामाजिक संस्थांतर्फेही लसीकरण करून घेतले. शहरातील वंचित, सुपरस्प्रेडर्स आणि आधारकार्ड नसणाऱ्यांची वर्गवारी करून त्यांना लस दिली. महापालिकेत जाऊ न शकणाऱ्यांसाठी ‘लस आपल्या दारी’ उपक्रम राबवून तब्बल सात हजारांपेक्षा जास्त नागरिकांना लस देण्यात आली. महापालिकेच्या विविध प्रयत्नांमुळे १०० टक्के नागरिकांना पहिला डोस देण्यात यश आले आहे.
दुसऱ्या डोससाठी ५२ टक्के लसीकरण
नवी मुंबईतील पाच लाख ७६ हजार ५६७ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. दुसऱ्या डोससाठी ५२ टक्के लसीकरण पार पडले आहे. तब्बल १६ लाख ८३ हजार ८०० नागरिकांना डोस देण्यात पालिकेला यश आले आहे. पात्र ठरलेल्यांपेक्षा जास्त नागरिकांना पहिला डोस दिल्यामुळे पालिकेला १००.२ टक्के लसीकरण करता आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.