मुंबई

Navi Mumbai: नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, आजपासून तीन दिवस पाणी कपात

Navi Mumbai Municipal Corporation: शनिवारपासून आठवड्यातून तीन दिवस सायंकाळी विभागवार पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Water Cut: नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणामध्ये ४१ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने शनिवारपासून आठवड्यातून तीन दिवस सायंकाळी विभागवार पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईनंतर स्वतःच्या मालकीचे धरण असलेली नवी मुंबई एकमेव महापालिका आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात धावरी नदीवर हे धरण बांधण्यात आले आहे. या धरणातून नवी मुंबई महापालिकेला बेलापूर ते ऐरोलीपर्यंत पाणीपुरवठा केला जातो. तसेच सिडको क्षेत्रात खारघर, कामोठे येथेही पाणी दिले जाते.

उन्हाळ्यामध्ये पाणीबचत करता यावी, यासाठी प्रत्येक विभागात आठवड्यातून दोन दिवस सायंकाळी पाणीकपात चालू केली होती. सद्यस्थितीमध्ये धरणामध्ये ४१ दिवस पुरेल एवढे पाणी आहे. त्यामुळे २५ जुलैपर्यंत पाणीसाठा आहे.

अशातच जूनचा अर्धा महिना होत आला, तरी म्हणावा तसा पाऊस धरण क्षेत्रात झाला नसल्याने भविष्यात नवी मुंबईकराना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे १५ जूनपासून पाणीकपातीचे नवीन वेळापत्रक लागू करण्यात आले आहे.

पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने वेळापत्रकामध्ये बदल केला आहे. त्यानुसार सायंकाळच्या पाणीकपातीमध्ये वाढ करण्यात आली आहे. यापुढे आठवड्यातून तीन दिवस पाणीपुरवठा होणार नाही. सकाळचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार असून नागरिकांनी पाणी जपून वापरावे.

- अरविंद शिंदे, अतिरिक्त शहर अभियंता

नवीन वेळापत्रक

विभाग वार

बेलापूर सोमवार, बुधवार, शुक्रवार,

नेरूळ मंगळवार, गुरुवार, शनिवार

तुर्भे मंगळवार, गुरुवार,रविवार

वाशी सोमवार, बुधवार, शुक्रवार

कोपरखैरणे मंगळवार, गुरुवार, शनिवार

घणसोली बुधवार, शुक्रवार, रविवार

ऐरोली मंगळवार, शुक्रवार

सिडको नोड सोमवार, गुरुवार व शनिवार

धरणातील सद्यस्थिती - आजचा पाऊस - ० मि.मी.

आतापर्यंतचा पाऊस - ६९.४० मि.मी.

आजची धरण पातळी - ६९.४२ मी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

Sakal Podcast: मध्यमवर्गीयांना अच्छे दिन येणार ते पीएम मोदींना मिळाला 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर' पुरस्कार

Baramati Assembly constituency 2024 : बारामतीच्या सांगता सभांकडे राज्याचे लक्ष..!

SCROLL FOR NEXT