Navi Mumbai esakal
मुंबई

Navi Mumbai : नवी मुंबई होणार अतिक्रमण मुक्त च उपायुक्तांनी काढले हे आदेश!

सकाळ डिजिटल टीम

नवी मुंबई शहरात अनधिकृत बांधकामे, मोकाट सुटलेले फेरीवाले यांचा सुळसुळाट झाला हे. याप्रकरणी नवी मुंबई महापालिकेवर न्यायालयाने वारंवार ताशेर ओढले आहेत. याची नोंद घेत तसेच यापूर्वीच्या अनेक परिपत्रकांचा आधार घेत महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांनी विभाग अधिकाऱ्यांना कर्तव्यात कुचराई केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावयाला सुरुवात केली आहे.

नवी मुंबई हे सिडकोने वसवलेले नियोजित शहर आहे. या शहरामध्ये किती लोकसंख्येसाठी किती घाऊक मार्केट असावीत, दैनंदिन गरजेच्या वस्तूंची किती मार्केट असावीत याचे निकष ठरलेले आहेत. एखाद्या रहिवासी वसाहतीत किती घरे असावीत, त्यानुसार तेथील पायाभूत सुविधा कशा असाव्यात हेही ठरलेले आहेत. असे असताना या शहराला अनधिकृत बांधकामांचा विळखा पडला आहे.

त्यामुळे गावठाणातील घरे सहा मजली झाली आहेत. आशिया खंडातील सर्वांत मोठी बाजार समिती म्हणून ओळखली जाणारी नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील गाळेधारकांनी त्यांच्या गाळ्यांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे केली आहेत. झोपड्या बहुमजली झाल्या आहेत. शहरात असा एकही रस्ता नाही जिथे फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले नाही.

एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने नवी मुंबईला फटकार लगावली. याची दखल घेत नवनियुक्त उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांनी कारवाईला सुरुवात केली आहे. ज्या अधिकाऱ्यांनी अनधिकृत बांधकामांना संरक्षण दिले, ज्यांच्या काळात सर्वात जास्त अशी बांधकामे झाली, त्यांची यादी बनवण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. त्यानुसार चालु असलेली अनधिकृत बांधकामांविषयी खुलासा करावा, अशी कारणे दाखवा नोटीस तुर्भे विभागाचे विभाग अधिकारी भरत धांडे यांना बजावण्यात आली आहे.

शाळेची मैदाने खुली करणार

शाळांची मैदाने शाळेच्या वेळेच्या व्यतिरिक्त स्थानिक मुलांना खेळण्यासाठी खुली ठेवण्याचे आदेश आहेत. पण, अनेक शाळा या आदेशाला केराची टोपली दाखवतात. अशी मैदाने खुली करण्यात येणार आहेत. पुढच्या टप्प्यात मॉल, शाळा, महाविद्यालय, आलिशान उपहारगृह, रुग्णालय, रहिवासी टॉवर हेही अतिक्रमण विभागाच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Rathod won in Digras Assembly Election Results 2024: माणिकराव ठाकरेंचा पुन्हा पराभूत, हायव्होल्टेज लढतीत संजय राठोड विजयी

Eknath Shinde : एकनाथ शिंदे महाविकास आघाडीपेक्षा भारी, केलीय आता पुढची तयारी

"त्याने माझ्या तब्येतीची चौकशी केली आणि..." शुटिंगमुळे थकलेल्या सलमानच्या कृतीने भारावली हिना , म्हणाली...

Prakash Solanke won Majalgaon Assembly election 2024 final Result: माजलगावमध्ये अटीतटीच्या लढतीत प्रकाश सोळंके विजयी, शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव

Ballarpur Assembly Constituency Result 2024 : बल्लारपूरमध्ये भाजपचा गुलाल! सुधीर मुनगंटीवारांनी 105969 मतांनी गड राखला

SCROLL FOR NEXT