crime news mumbai  Sakal
मुंबई

Navi Mumbai News: परांचीद्वारे 13 माळे चढुन घरफोडी करणारी दुक्कली गजाआड

सकाळ वृत्तसेवा

Navi mumbai Crime: नेरुळ पोलिसांनी परांचीद्वारे 13 माळे चढुन घरफोडी करणाऱया दुक्कलीला अटक केली आहे. सजीकूल शेकाबुल शेख (24) व मोहम्मद रिसाल अझरुल शेख (20) अशी या दोघांची नावे आहेत. या चोरटयानी सदर फ्लॅटमधून चोरीला गेलेला 2 लाख 12 हजार रुपये किंमतीचा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. न्यायालयाने या दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेले सजीकूल शेख व मोहम्मद रिसाल अझरुल शेख हे दोघेही कोपरखैरणे भागात राहण्यास आहेत. तसेच ते इमारती भोवती परांची बांधण्याचे काम करत होते. गत आठवडयात या दोघांना नेरुळ सेक्टर-28 मधील ईश्वरर एक्सटसी या इमारतीला परांची बांधण्याचे काम मिळाले होते.

सदर इमारतीला परांची बांधतानाच या दोघांनी सदर इमारतीच्या 13 व्या मजल्यावरील बंद फ्लॅटच्या बाल्कनीची स्लायडिंगची खिडकी उघडून त्या वाटे त्यांच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर या चोरटÎांनी सदर फ्लॅटमधुन दागिने व रोख रक्कम असा सुमारे 2 लाख 12 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला होता.

दुपारी 3 च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्यानंतर फ्लॅट मालक अभिनव गाजटा याने नेरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन ढगे, निलेश शेवाळे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली होती.

सदर फ्लॅटमध्ये चोरटयानी स्लाईडींगच्या खिडकीवाटे प्रवेश करुन सदरची चोरी केल्याचे तपासात आढळून आल्यानंतर पोलिसांनी सदर इमारतीला परांची बांधणाऱया नाक्यावरील कामगारांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु केली.

या चौकशीदरम्यान सजीकूल शेख व मोहम्मद रिसाल अझरुल शेख या दोघांनी सदरची चोरी केल्याचे कबूल केले. त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक करुन त्यांनी चोरलेला सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT