मुंबई

Navi Mumbai: 4 लाखांची लाच घेणारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अडकला एसीएबीच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा

Latest NAvi Mumbai News: बेलापूर येथील एका बांधकाम व्यावसायिकाकडून चार लाखांची लाच घेताना एनआरआय सागरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश कदम यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) मुंबई युनिटने मंगळवारी रात्री अटक केली.

वेगवेगळ्या गुन्ह्यांत अडकविण्याची भीती दाखवून कदम यांनी बांधकाम व्यावसायिकाकडे ५० लाखांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी १४ लाख उकळले होते.

जुलै महिन्यामध्ये बेलापूर येथील शहाबाज गावात ‘इंदिरा निवास’ इमारत कोसळली होती. या प्रकरणात एनआरआय पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक महेश कुंभार याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश कदम यांनी कुंभार यांना विविध गुह्यात अडकवून त्यांच्यावर गंभीर कलमे लावण्याची धमकी दिली होती.

तसेच, या प्रकरणातून सुटका करण्यासाठी कदम यांनी ५० लाखांची लाच मागितली होती. तडजोडीअंती कुंभार यांनी १८ लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार, कुंभार यांचा मुलगा अजयने २३ सप्टेंबर रोजी १२ लाख आणि २७ सप्टेंबर रोजी दोन लाख रुपये कदम यांना दिले होते.

---

राहत्या घरातून ताब्यात

दरम्यान, एनआरआय पोलिसांनी कुंभार यांच्याविरोधात एका महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुह्यातही कदम यांनी पाच लाखांची मागणी केली होती; मात्र कुंभार यांच्या मुलाने चार लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली आणि कदम यांच्याविरोधात थेट मुंबईच्या एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली. त्यानुसार कदम यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एसीबीने सापळा रचला. मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कदम यांनी उलवे येथील राहत्या घरी कुंभार यांच्याकडून चार लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. 4 लाख रुपयांची लाच घेणारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अडकला एसीएबीच्या जाळ्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddiqui: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार; लिलावती रुग्णालयात उपचार सुरु

अदानीचे टेंडर रद्द करणार आणि जागा पोलिसांना..! उद्धव ठाकरेंनी सांगितला सरकार आल्यानंतरचा प्लॅन

IND vs BAN, 3rd T20I: दसऱ्याच्या दिवशी टीम इंडियाची आतषबाजी! सॅमसनचं शतक, तर सूर्याची फिफ्टी अन् विक्रमी २९७ धावांचा डोंगर

Uddhav Thackeray Dasara Melava: राज्य माता गाय झालीये... आर्यन खानचं नाव घेत गोरक्षकांवर भडकले उद्धव ठाकरे

IND vs BAN, 3rd T20I: टीम इंडियाची 'Power'! संजू सॅमसनची खतरनाक बॅटींग, सूर्याची फटकेबाजी, रेकॉर्ड ब्रेकिंग खेळ

SCROLL FOR NEXT