नवी मुंबईकरांनो..! नववर्षात 'हे प्रकल्प' तुम्हांला वेगवान करणार 
मुंबई

नवी मुंबईकरांनो..! नववर्षात 'हे प्रकल्प' तुम्हांला वेगवान करणार

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : रस्ते, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, पदपथ, गटारे, उद्यान, शिक्षण, आरोग्य, मलनिःसारण केंद्र आदी पायाभूत सुविधांच्या पुढे जाऊन महापालिकेतर्फे नव्या वर्षात वास्तववादी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सायन्स पार्क, जलतरण तलाव, सेंट्रल पार्क, सीएन्डडी वेस्ट, बायोमिथेन प्रकल्प, कचरा वीज प्रकल्प, घणसोली-ऐरोली जोडणारा उड्डाणपूल आदी फेरनिविदेच्या घेऱ्यात अडकलेल्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाची पुढील वर्षात पायाभरणी होण्याची अपेक्षा पालिकेकडून वर्तवण्यात येत आहे. पालिकेच्या या प्रकल्पांपैकी नवी मुंबईकरांना नव्या वर्षात मेरिटाईम बोर्ड आणि सिडकोच्या संयुक्त विद्यमाने सुरू होणाऱ्या जलवाहतुकीमुळे नवी मुंबईकरांचे जीवन वेगवान होणार आहे. 

सरत्या वर्षात नवी मुंबई महापालिकेला मोठ्या प्रकल्पांच्या उभारणीत फारसे यश न मिळाल्यामुळे तीन हजार 500 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पातील फक्त एक हजार कोटींची रक्कम पायाभूत सुविधांवर खर्च करता आली. त्यामुळे नव्या वर्षातील प्रकल्पांसाठी महापालिकेची तिजोरी भरलेली आहे. चालू वर्षात महापालिकेच्या तिजोरीत वर्षभर खर्च केल्यानंतरही तब्बल तीन हजार कोटींची रक्कम शिल्लक राहिली आहे. त्यामुळे नव्या वर्षात राबवण्यात येणाऱ्या मोठ्या प्रकल्पांच्या उभारणीला वेग मिळणार आहे. 

सरत्या वर्षात हे प्रकल्प मार्गी 
घणसोली सेंट्रल पार्क, वाशी अग्निशमन केंद्र, कोपरखैरणे अग्निशमन केंद्र, जुईनगर सेन्सरी गार्डन, नेरूळमधील अण्णा भाऊ साठे कम्युनिटी सेंटर, सीबीडी कम्युनिटी सेंटर, पामबीच भुयारी मार्ग, तुर्भे मार्केट पादचारी पूल, वाशी सेक्‍टर 14, कम्युनिटी सेंटर, अडथळा विरहित पदपथांची 50 टक्‍क्‍यांपर्यंत कामे पूर्ण करण्यात अभियांत्रिकी विभागाला यश मिळाले. 

900 कोटींचे प्रकल्प मार्गी लागणार 
ऐरोलीतील नाट्यगृह, वाशी जलतरण तलाव, सायन्स पार्क, तुर्भे उड्डाणपूल, सीबीडी-बेलापूर बहुमजली वाहनतळ, वाशी डेपोचा विकास, कत्तलखाना, पशुवैद्यकीय दवाखाना, कोपरखैरणे माता-बाल रुग्णालय, घणसोली येथे सेंट्रल मेडिकल स्टोअर, वाशी व बेलापूर पावसाळी उदंचन केंद्र, उरण-तुर्भे सेवा रस्त्याचा कॉंक्रीट विकास, एमआयडीसीतील डी-ब्लॉकमधील रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणातून विकास, अमृत योजनेतून सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प आदी महत्वाच्या प्रकल्पांची कामे सध्या प्रगतिपथावर असून पुढील वर्षी मार्गी लागतील. 

मेट्रोमुळे वेगवान प्रवास 
नवी मुंबईकरांना 2020 मध्ये सिडकोतर्फे उभारण्यात येत असलेल्या मेट्रोचा लाभ घेता येणार आहे. बेलापूर ते पेंधर या 11 किलोमीटरच्या मार्गावर तयार करण्यात येत असलेल्या मेट्रोचे 99 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित रेल्वेस्थानकांचे नव्या वर्षात काम पूर्ण झाल्यावर मेट्रोची सफर घडणार आहे. 

जलवाहतूकीमुळे प्रवास सुखकर
मुंबई पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड आणि सिडको यांच्यामार्फत नेरूळ-भाऊचा धक्का ते मांडवा या मार्गावर सुरू करण्यात येणारी जलवाहतुकीला 2020 मध्ये प्रारंभ होणार आहे. भाऊचा धक्का व मांडवा येथील जेट्टीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. नेरूळच्या जेट्टीचे 70 टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम नव्या वर्षात पूर्ण होणार आहे. त्यामुळे मेरिटाईम बोर्डाने रो-रो सेवा देणाऱ्या परदेशातून दोन बोट मागवल्या आहेत. या बोट दाखल झाल्यावर नेरूळ ते भाऊचा धक्का ही जलवाहतूक सुरू केली जाणार आहे. 

95 हजार घरांची लॉटरी
सिडकोतर्फे रेल्वे कॅफेटेरिया, बस डेपो आदी मोकळ्या भागात उभारण्यात येत असलेल्या 95 हजार गृहप्रकल्पांच्या उभारणीलाही 2020 वर्ष लागणार आहे. या प्रकल्पांपैकी काही रेल्वेस्थानकांजवळील मोकळ्या जागांवर घरे उभारण्याची योजना राबवली जाणार आहे. नुकत्याच सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी या जागांची पाहणी करून कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT