Navneet Ravi Rana News | Hanuman Chalisa Row Sakal
मुंबई

राणा दाम्पत्याचा जामीन रद्द होणार? माध्यमांशी बोलणं भोवण्याची शक्यता

न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करताना काही अटी घातल्या होत्या. या अटींचा भंग झाल्यास त्यांचा जामीन रद्द होणार होता.

सकाळ डिजिटल टीम

मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्याचा अट्टाहास केल्या प्रकरणी राणा दाम्पत्याला राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. यावेळी न्यायालयाने काही अटीसुद्धा घातल्या होत्या. या अटी पाळल्या न गेल्याने आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नवनीत राणा आणि रवी राणा यांना जामीन देताना न्यायालयाने त्यांना माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास मज्जाव केला होता. मात्र तरीही दोघांनीही माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावरूनच शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी राणा दाम्पत्यावर न्यायालयाच्या अटींचं उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर आता राणा दाम्पत्याच्या वक्तव्यांची पोलिसांकडून चौकशी होणार असून त्यात आक्षेपार्ह बाब आढळली तर त्यांचा जामीन अर्ज रद्द होऊ शकतो. शिवसेना याच प्रकरणी आता न्यायालयातही जाण्याच्या विचारात आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

काय होत्या न्यायालयाच्या अटी?

  • माध्यमांशी बोलण्यास मज्जाव

  • दोघांना प्रत्येकी ५० हजार रुपये भरावे लागणार

  • पुराव्याशी छेडछाड केल्यास जामीन रद्द

  • ज्या कारणामुळे त्यांना अटक झाली, ती कृती ते परत करू शकत नाहीत.

  • तपास करणारा अधिकारी जेव्हा त्यांना चौकशीसाठी बोलवेल तेव्हा हजर राहावं लागेल. तपास अधिकाऱ्यालाही २४ तास आधी राणा दाम्पत्याला नोटीस देणं बंधनकारक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT