Nawab Malik addressing the media regarding his son-in-law Sameer Khan’s health condition.  Esakal
मुंबई

नवाब मलिक यांच्या जावयाच्या निधनाचे वृत्त अफवा! महत्त्वाची अपडेट समोर...

Sandip Kapde

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राकांपा एपी) नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जावई समीर खान यांच्या प्रकृतीबाबत शनिवारी रात्री उशिरा खोटी माहिती पसरली. समीर खानचा रुग्णालयात मृत्यू झाला, अशी अफवा काही वेळातच शहरभर पसरली होती. मात्र, या अफवांची सत्यता नवाब मलिक यांनी स्पष्ट करत फेटाळली आहे.

नवाब मलिकांची महत्वाची प्रतिक्रिया

नवाब मलिक यांनी याबाबत लगेचच माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी त्यांच्या जावयाच्या प्रकृतीची सध्याची स्थिती समजावून सांगितली. मलिक म्हणाले, "समीर खानच्या प्रकृतीबाबत काही चुकीची माहिती पसरवली जात आहे. त्याची प्रकृती काल गंभीर होती, परंतु आता त्याच्या प्रकृतीत काही सुधारणा दिसून आली आहे. कृपया अशा अफवा पसरवू नका. आम्ही सर्वांच्या प्रार्थना आणि पाठिंब्याबद्दल आभारी आहोत."

खोटी माहिती कशी पसरली?

समीर खान गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा अपघात झाला होता. त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आल्यानंतर शनिवारी रात्री सोशल मीडियावर अफवा पसरवल्या की त्याचे निधन झाले आहे. या अफवांमुळे खान कुटुंबीयांवर मानसिक ताण निर्माण झाला आणि तातडीने नवाब मलिक यांनी लोकांसमोर येऊन वस्तुस्थिती स्पष्ट केली.

नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा सांगितले की, सर्वांनी संयम बाळगावा आणि योग्य माहिती मिळाल्याशिवाय कोणतीही अफवा पसरवू नये. त्यांची विनंती आहे की, खानच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा आणि कुटुंबाला पाठिंबा द्या.

Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडणारा एकजण अल्पवयीन? आरोपीने कोर्टासमोर दिली माहिती

Mumbai Indians संघात द्रविडच्या खास माणसाला मिळणार 'जॉब'? पण मग मलिंगा...

Who is Anuj Thapan: ज्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी Bishnoi Gang नं बाबा सिद्दिकींना मारलं, तो Anuj Thapan नेमका आहे तरी कोण?

Group Food Ordering : जेवण ऑनलाईन ऑर्डर करताय? ग्रुपने ऑर्डर करणं तुमच्या फायद्याचं,Swiggy अन् Zomatoने सांगितल कारण..

Ranji Trophy 2024: कोटियनच्या ५ विकेट्स अन् मुंबईचं सामन्यात पुनरागमन! बडोद्याला १८५ धावांवर गुंडाळलं

SCROLL FOR NEXT